Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत गालबोट लावणाऱ्या श्रीरामपूर संघावर तीन वर्षाची बंदी घालण्याची मागणी

कर्जत : येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वर्ष वयोगटाच्या अंतिम सामन्याचे वेळी श्रीरामपूर तालुका टाकळीभान संघ यांनी गोंधळ घातला व गैरवर्त

सेनापती बापट साहित्य संमेलनात साहित्य रसिकांसह वाचनालयांचा सन्मान
‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिव्यांगांना समान संधीसाठी सहाय्य करा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कर्जत : येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वर्ष वयोगटाच्या अंतिम सामन्याचे वेळी श्रीरामपूर तालुका टाकळीभान संघ यांनी गोंधळ घातला व गैरवर्तन केले यामुळे तीन वर्षासाठी या संघावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी कर्जत मधील कबड्डी खेळाडू पालक नागरिक यांनी केली असून तसे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी यांना देण्यात आले आहे. व तसे झाले नाही तर आंदोलन करण्यात आली शाळा दिला आहे.कर्जत येथे पार पडलेल्या जिल्हास्तर कबड्डी स्पध्र्येच्या सुंदर व उत्कृष्ठ नियोजनास गालबोट लावण्याचा प्रयत्न श्रीरामपूर तालुका (टाकळीभान संघ) १७ वर्षे मुलांच्या कबड्‌डी संघावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी व श्रीरामपूर तालुका संघाची अनधिकृत फेर सामना घेण्याची मागणी मान्य झाल्यास कर्जत संघातील खेळाडू व ग्रामस्थ जिल्हा क्रीडा कार्यालयासमोर उपोषणास बसून आंदोलन करणार आहेत.

 शुक्रवार दिनांक:-०३/१०/२०२५ रोजी जिल्हास्तरीय कबड्‌डी स्पर्धा १७ वर्षे वयोगट मुले व मुली दादा पाटील महाविद्यालय, कर्जत जिमखाना विभाग येथे समर्थ माध्य, व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत यांनी आयोजित होत्या. संपूर्ण दिवसभर मुले व मुलींचे सामने व्यवस्थित पार पार पडले. संध्याकाळी साडे सहा वाजता मुलांचा एकच फायनल चा सामना सुरू झाला. कर्जत विरुद्ध श्रीरामपूर हा अंतिम सामना पहिला हाफ होईपर्यंत सुरळीत चालला.  पहिले हा पर्यंत कर्जतचा संघ एक गुणांनी आघाडीवर होता. गुणलेखक वेळाधिकारी, पंच, सरपंच सगळेच जण आपापले काम चोखपणे पार पाडत होते. श्रीरामपूरच्या संघाबरोबर तीन ते चार क्रुझर मधून आलेले तीस ते पस्तीस ग्रामस्थ हे यावेळी उपस्थित झाले. त्यातील अनेकांनी दारू पिलेली होती. पहिला हाफ संपल्यानंतर हे सर्व सातत्याने स्पर्धेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू लागले. माईक वरून त्यांना सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु ते जास्त ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळेसही श्रीरामपूरच्या संघाबरोबर आलेले कोच व ग्रामस्थ यांना समज देण्यात आली. आपण मैदानामध्ये येऊ नका व खेळाडूला त्रास होईल अशा पद्धतीचे वर्तन करू नका असे अनेक वेळा सांगून झाले. श्रीरामपूर संघातील खेळाडूंना पंचांनी ताकीद दिली एका जणाला हिरवे कार्ड दाखवले तरी देखील त्यांचे गैरवर्तन सुरू होते.

एका चढाई च्या वेळेस श्रीरामपूरच्या खेळाडूने कर्जतच्या खेळाडूची पकड केली व त्याला खाली पाडले. खाली पाडल्यानंतर कोपराने समर्थ विद्यालयाच्या (कर्जत तालुका) खेळाडूला मारले. कर्जतच्या खेळाडूच्या कानावर व मानेवर जोरदार मार बसला. त्यात तो खेळाडू जखमी झाला. गोंधळ झाल्यावर दारू पिलेले सर्व ग्रामस्थ मैदानात शिरले धिंगाणा घालू लागले. हा सगळा वाद मिटवण्यात आल्यानंतर खेळ सुरू करण्यासाठी सांगण्यात आले. श्रीरामपूर संघासोबत आलेले कोच मुलांना खेळवण्यास तयार होते. परंतु त्यांच्याबरोबर आलेले इतर जे लोक हजर होते ते खूप ड्रिंक केलेले असल्यामुळे त्यांनी खेळाडूना खेळू दिले नाही. त्या अगोदरही श्रीरामपूर तालुका संघातील खेळाडूना पंचानी गैरवर्तन केल्या बद्दल एकदा ग्रीन कार्ड व दुसऱ्या वेळेस येलो कार्ड दाखवून समज दिली होती. अगदी सुरुवातीपासूनच वेळ आली तर गोंधळ घालून सामना बंद पडण्याचे पूर्वनियोजित केलेले दिसून येत होते. तीन ते चार क्रुझर मधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू पिवून उपस्थित असणारी माणसे व आपला संघ कसाही करून जिंकलाच पाहिजे. त्यासाठी काहीही गैरमार्ग करावा लागला तरी चालेल असेच त्यांचे वागणे होते. जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी  भाऊसाहेब वीर , पंच, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अनेक वेळा सामना सुरु करण्याच्या सूचना देवूनही श्रीरामपूर संघाच्या कोच, खेळाडूंनी त्यांच्या सोबत आलेल्या लोकांच्या सांगण्यावरून खेळण्यास नकार दिला. सायंकाळी अडीच तास सर्वाना वेठीस धरले. शेवटी क्रीडा अधिकारी श्री वीर  व पंच, क्रीडा समिती यांनी कर्जतचा संघ विजयी घोषित केला. श्रीरामपूर संघातील खेळाडू व ग्रामस्थ यांचे वर्तन खेळ भावनेला पोषक नव्हते. त्याचा परिणाम पुढील संघातील खेळाडूंवर पडणार असून मुलांमध्ये खेळाविषयी नकारात्मक भावना निर्माण होईल. या सर्व गोष्टींमध्ये श्रीरामपूरचा संघ दोषी असून आपल्या कार्यालयामार्फत या संघावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी व श्रीरामपूर तालुका संघाची अनधिकृत फेर सामना घेण्याची मागणी मान्य झाल्यास कर्जत संघातील खेळाडू व ग्रामस्थ जिल्हा क्रीडा कार्यालयासमोर उपोषणास बसून आंदोलन करतील जेणे करून पुढील काळात आयोजक शाळा व तालुक्याची बदनामी करण्याचा प्रकार शालेय स्पर्धांमध्ये होणार नाही.

COMMENTS