Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळून पर्जन्यचक्र खंडीत : अभय आव्हाड

पाथर्डी ः सध्या बेसुमार होत असलेल्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून पर्जन्यचक्र खंडित झाले आले.निसर्गाच्या असमतोलामुळे पुढील पिढीला भयं

महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा स्कूलचे यश
एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू

पाथर्डी ः सध्या बेसुमार होत असलेल्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून पर्जन्यचक्र खंडित झाले आले.निसर्गाच्या असमतोलामुळे पुढील पिढीला भयंकर दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. हे टाळण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले ते बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागमार्फत तुकाई माता डोंगर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी बोलत होते.
यावेळी 250 खड्डे घेऊन यामध्ये चिंच, आवळा, करंज, लिंब इत्यादी वृक्षांचे रोपण करण्यात आले. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमास नगरपालिका पाथर्डी,वन विभाग पाथर्डी तसेच हंडाळवाडी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये 250 स्वयंसेवकांना व एनसीसी छात्रांना हे वृक्ष दत्तक देण्यात आले.या वृक्षांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पुढे बोलताना अभय आव्हाड म्हणाले की, प्रत्येकाने एक झाड लावून जगवले तरी निसर्ग समतोल राखण्यास मदत होईल. महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला याचा आनंद असून लावलेली सर्व झाडे जगविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या झाडांची निगा राखण्याबरोबरच पुढील वर्षी याच ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. पुढील पाच वर्षात संपूर्ण तुकाई डोंगर परिसर हिरवाईने आच्छादित करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी विश्‍वस्त नंदूकुमार शेळके, वन अधिकारी अरुण साबळे, बबन मंचरे, विजय पालवे, अप्पा घनवट तसेच नारायण बापू धस, रामभाऊ भापकर,  सुरेश हंडाळ, प्रकाश धस, विक्रम कोरडे, रमेश हंडाळ इ. हंडाळवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी डॉ. अरुण राख, कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. अशोक डोळस, डॉ. अर्जुन केरकळ, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, प्रा. दत्तप्रसाद पालवे, डॉ. वैशाली आहेर, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. अशोक कानडे व इतर महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद उपस्थित होता.

COMMENTS