कुडाळ : दीपक भातुसे यांच्या हस्ते दीपक भुजबळ यांना पुरस्कार देण्यात आला. कुडाळ / वार्ताहर : कोंडवे (ता. सातारा) गावचे सुपुत्र आणि बामणोली जिल्हा प
कुडाळ / वार्ताहर : कोंडवे (ता. सातारा) गावचे सुपुत्र आणि बामणोली जिल्हा परिषद शाळचे मुख्याध्यापक दीपक शंकरराव भुजबळ यांना धगधगती मुंबई यांच्यावतीने दिल्या जाणार्या शिक्षणरत्न पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
दीपक भुजबळ यांनी गेली कित्येक वर्षे शिक्षण क्षेत्रात उठावदार काम केले आहे. कोरोना संकटात अनेक गरजूंना मदत मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. अडचणीत आलेल्यांच्या मदतीला धावून जाणारा ध्येयवेडा शिक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत धगधगती मुंबई यांच्यावतीेने त्यांना शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
याप्रसंगी पत्रकार दीपक भातुसे, डॉ. सुहास देसाई, दिलीप दडस, योगेश पाटणकर, जेयुएमचे अध्यक्ष नारायण पांचाळ, नगरसेवक वसंत नकाशे, श्रीकांत शेट्ये, सूर्यकांत लांडे, डॉ. संदीप डाकवे, भास्कर तरे, अखिल सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, संतोष मालुसरे, दत्तात्रेय पिंपरे, सौ. पूनम धुळप, सौ. कांचन भुजबळ उपस्थित होते.
COMMENTS