विरोधकांनाही प्रभावित करणाऱ्या कार्यनिष्ठा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विरोधकांनाही प्रभावित करणाऱ्या कार्यनिष्ठा !

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा आक्रमक शैलीचाच राहीला आहे. राज्यात ते भाजपचे प्रवक्ते असल्यापासूनच तडाखेबंद मांडणी करून सत्ताधाऱ्यांना घेरण्या

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत- पंतप्रधान
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय
राम चंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा आक्रमक शैलीचाच राहीला आहे. राज्यात ते भाजपचे प्रवक्ते असल्यापासूनच तडाखेबंद मांडणी करून सत्ताधाऱ्यांना घेरण्यात त्यांचा हातखंडा. तसाच, ते सत्तेत आले म्हणजे समुळ प्रशासन त्यांच्या आदेशाबरहुकूम कार्यरत होते. शासन आणि प्रशासनाची कार्यशैली ज्ञात झालेला नेता म्हणूनच फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आहे. सत्तेत असताना कसे काम करावे आणि सत्तेबाहेर असताना कसे कार्यरत रहावे, याचा वस्तुपाठ त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. खरेतर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू आम्ही सांगत नसून खुद्द त्यांचे विरोधक असणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे म्हणताहेत. नुकतेच महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झालेले उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याच मालकीच्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये संजय राऊत यांना दिलेल्या दीर्घ मुलाखतीत म्हणतात. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे कार्य अतिशय निष्ठेने पार पाडणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे त्यांचे वर्णन खुद्द शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केले आहे. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची महत्ता त्यांच्या विरोधकांना देखील मान्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हुजरे राजकारण करणारे शेकडोंनी दिसतात. एव्हाना मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी त्या  त्या पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे हुजरेगिरी करतांना दिसतात. परंतु, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे असे राजकीय व्यक्तिमत्त्व आहे की, त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी कधीही हुजरेगिरी केली नाही. पक्षाने जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीत यशस्वी होण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत! सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या . महाराष्ट्रासारख्या जागृत राज्यात भाजपला शंभरी पार नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पक्षांतर्गत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारूनही पक्षाला शंभरी पार नेणे ही तशी पाहिली तर साधी बाब नाही. त्यांनी निवडणुकीत ‘पुन्हा येईन,’ अशी आव्हान वजा हाकाटी दिली होती. ती बाब त्यांनी सत्य करून दाखवली. कारण शिवसेना आणि भाजप हे एकत्र निवडणूका लढले होते.त्यामुळे एकूण दीडशेपार जागा घेणाऱ्या या युतीला आणि पर्यायाने फडणवीस यांच्याकडे सत्ता चालून आली होती. परंतु,  सत्तेपासून उध्दव ठाकरे यांनी रोखले. त्यांच्या या कार्याची परतफेड फडणवीस यांनी त्याचकाळात  उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून केली. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही राजकीय नेत्याने एवढी तत्परता कधीच दाखविली नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रभावी नेते होऊन गेले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीची ढबच निराळी. आक्रमकता, जशास तसे, ठोशास ठोसा,‌‌ संबंधांना जागणारे, राजकीय सत्ताधाऱ्यांना जे अवगुण चिकटतात त्यापासून ते कोसो दूर आहेत. राजकारणात प्रतिमा स्वच्छ ठेवल्याशिवाय आक्रमकतेला वाव नसतो. फडणवीस यांचे आक्रमक राजकीय व्यक्तिमत्त्व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची साक्ष देते. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांना राजकारणातील अशी गती कधी साध्य झाली नाही. राजकारणात करावयाच्या बाबी बऱ्याचवेळा छुप्या पद्धतीने कराव्या लागतात. परंतु, फडणवीस हे कोणतीही गोष्ट ‘डंके चोट पर ‘, सांगूनच करणार. त्यामुळे, काहीवेळा त्यांच्या स्पष्टवक्तेपणा किंवा मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे कधीं कधीं त्यांनाच दुष्परिणामही भोगावे लागतात; पण, त्यावरून ते कधी डगमगून जात नाहीत. त्यांच्या ‘मी पुन्हा येईन, या घोषणेवरून महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ‘ हास्यजत्रा ‘ या विनोदी कार्यक्रमात त्यांच्या त्या भाकीतातील घोषणेला कोट करण्यात आले तेव्हा त्यांनी त्यावर मोकळेपणाने हसून दाद तर दिलीच, पण, त्यावर त्यांनी एक सत्य बाबही सांगून टाकली की, ‘कधीं कधीं यासाठी पाच वर्षे देखील वाट पहावी लागते ‘, त्यांचा हा दिलखुलासपणा देखील तेवढाच स्पष्ट आहे. एकंदरीत देवेंद्र फडणवीस हे असे राजकीय व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांच्याकडे मुत्सद्दीपणा, संघटक कौशल्य, अभ्यासू वृत्ती, आक्रमक आणि तितकाच स्पष्ट आणि मिश्किल असा स्वभाव. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करणे आणि तसे करून मिळवलेल्या यशानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश पाळण्याची शिस्त असा एकंदरीत गुणांचा समुच्चय असणारे महाराष्ट्रातील ते आजपर्यंतच्या राजकारणातील एकमेव व्यक्तिमत्त्व असल्याचे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती नाही !

COMMENTS