Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह ः आ. आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी : केंद्र शासनाने 2023-24 च्या गळीत हंगामासाठी ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत रु.100/- प्रतिटन वाढ करण्याच्या नि

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पिक विम्याचे निकष बदला
समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या
विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही

कोपरगाव प्रतिनिधी : केंद्र शासनाने 2023-24 च्या गळीत हंगामासाठी ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत रु.100/- प्रतिटन वाढ करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत असून एफ.आर.पी.च्या दरात वाढ करतांना केंद्र शासनाने साखरेच्या किमान विक्री मुल्यामध्ये (च.ड.झ.) देखील वाढ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना अशोक भगत यांनी मांडली सदर सूचनेस राजेंद्र गिरमे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. सभेसाठी सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. आपल्या भाषणात पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीच्या हिताचे जे काही निर्णय झाले आहे त्या निर्णयांचे आजवर स्वागत केलेले आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांचे हित पाहिले आहे. त्यामुळे एफ.आर.पी. मध्ये वाढीचा निर्णय निश्‍चितपणे चांगला असून त्याचे स्वागत करणे गरजेचे आहे. त्याबरोबर साखरेच्या किमान विक्री मुल्यामध्ये (च.ड.झ.) वाढ केल्यास बँकेकडून प्राप्त होणारी उचल रक्कमेत वाढ होईल व सभासदांना वेळेत रक्कम अदा करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे एकून परिस्थितीनुसार साखरेच्या किमान विक्री मुल्य किमान रु.3600/- ते रु.3700/- करावे अशी मागणी केली. 2022-23 या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रुपये 3 कोटी 6 लाख इतका झालेला असून 31 मार्च 2023 अखेर एकूण संचित नफा 24 कोटी 17 लाख राहिला आहे. यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने  सत्कार करण्यात आला यामध्ये आडसाली-चंद्रशेखर देशमुख, संवत्सर, पूर्व हंगामी-गोरखनाथ सोनवणे, लक्ष्मणपूर, सुरु-मिलिंद धारणगावकर, धारणगाव, खोडवा-रविंद्र दराडे, सत्यगाव या शेतक-यांचा समावेश होता. सभेचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले. अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. यावेळी विषय पत्रिकेवरील 1 ते 10 विषय टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले. आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले. याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे, माजी संचालक बाळासाहेब कदम, विश्‍वासराव आहेर, पद्माकांतजी कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, बाबासाहेब कोते, नारायण मांजरे, अ‍ॅड.आर.टी.भवर, संभाजीराव काळे, कचरू घुमरे, सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य,नगरपालिकेचे सदस्य, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्‍वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेंढेंगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे पाणी वाटपाचे आदेशामुळे गोदावरी कालव्याच्या कार्यक्षेत्रावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय येथेही सदरचा अहवाल चुकीच्या गृहीतकांवर आधारीत असल्याने त्यावरुन जायकवाडी धरणात पाणी सोडू नये अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत. मेंढेंगिरी समितीचा अहवाल कालबाहय झाल्यामुळे राज्य शासनाने ऑगस्ट 2023 मध्ये नविन समितीची नेमणूक करुन उर्ध्व गोदावरी खो-यातील पाणी वाटपाबाबत नव्याने मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे काम समितीस दिले आहे. सदर समितीने वेळेत अहवाल येईपर्यंत समितीच्या अहवालाप्रमाणे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ नये अशा प्रकारची जनहीत याचिका कारखान्याचे वतीने सभासदांमार्फत मा. उच्च न्यायालयात दाखल केली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय येण्याची अपेक्षा आहे. आमदार आशुतोष काळे.

COMMENTS