Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्या !

ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा न

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणूकीचे वारे; राष्ट्रवादीच्या आमदारासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा अर्ज बाद
सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या | LOKNews24
पालिका आयुक्तांच्या केबिन समोर माजी नगरसेवकाने फोडले मडके

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा निर्णय दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला बर्‍याच दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अजूनही झालेला परिणामी मंगळवारी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमदारांच्या अपात्रतेचा फैसला लवकरात लवकर घेण्यासदंर्भात निर्देश देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून शिंदे- फडणवीसांची साथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निलंबनाबाबत ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या सगळ्यात आता उद्धव ठाकरे गटासोबत शरद पवार असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षांना या निलंबनाबाबत निर्देश देण्यात यावेत. सुनील प्रभू यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अनिल बाबर, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले,  बालाजी किणीकर, लता सोनावणे, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर, रमेश बोरनारे या आमदारांचा समावेश आहे.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्बल 40 आमदार फोडले. मात्र, राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतूद सांगते की, दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचा गट फुटल्यास त्यांना दुसर्‍या पक्षात विलीन व्हावे लागते. मात्र, शिंदे यांचा गट कुठल्याही पक्षात विलीन तर झालाच नाही, पण त्यांनीच शिवसेनेवर दावा ठोकला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. मात्र विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.

घाईही नाही आणि विलंबही करणार नाही ः नार्वेकर – 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कधीपर्यंत निर्णय देणार? यावर बोलतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत आम्ही निर्णय देऊ, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. राजकीय पक्ष कोणता आहे, हे पहिल्यांदा आम्हाला पहावे लागेल. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नेतृत्व कोण करते आहे? पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नेतृत्व योग्य आहे का? हे पाहूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निर्णय घेताना घाईही करणार नाही. आणि विलंबही लावणार नाही.

COMMENTS