Homeताज्या बातम्यादेश

केरळमधील मृतांची संख्या 165 वर

तब्बल 200 पेक्षा अधिक जण बेपत्ता बचावकार्य सुरूच

वायनाड ः केरळ राज्यातील वायनाडमधील मेपड्डीच्या परिसरातील चार गावांमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 165 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर

ऑलिम्पिक प्रसारणात प्रसारभारतीची नेत्रदीपक कामगिरी
बिग बॉस मधून बाहेर येताच जिया शंकर झाली मालामाल
WhatsApp ने मार्च महिन्यात 47 लाख खाती केली बंद

वायनाड ः केरळ राज्यातील वायनाडमधील मेपड्डीच्या परिसरातील चार गावांमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 165 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 200 हून अधिक जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळे येतांना दिसून येत आहे. केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, या अतिवृष्टीने अनेक गावे वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे. यापावसात मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात भूस्खलन झाले, त्यात घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेल्यामुळे केरळमध्ये आभाळ फाटले आहे. भारतील लष्कराकडून बचावकार्यक करण्यात येत असले तरी पावसामुळे अनेक अडथळे निर्माण होतांना दिसून येत आहे. आर्मी, एअरफोर्स, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक बाधित भागात बचावकार्यात गुंतले आहेत. रात्री उशिरापर्यंत ढिगार्‍याखालून 1 हजार जणांची सुटका करण्यात आली होती. रात्री बचावकार्य थांबवण्यात आले, जे सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. मंगळवारी 225 लष्करी जवानांना कन्नूरहून वायनाडला पाठवण्यात आले. बचावकार्यासाठी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले होते, मात्र पावसामुळे त्यांना कोझिकोडला परतावे लागले. हवामान खात्याने वायनाड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसह 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे, तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट जारी केला आहे. या अपघातानंतर राज्यात दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी 12 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळ विद्यापीठाने बुधवार आणि गुरूवारी होणार्‍या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

COMMENTS