Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी

फोन उचलला नाही म्हणून आरोपी थेट मध्यरात्री घरी

संगमनेर/प्रतिनिधी ः तहसीलदारांना केलेले फोन उचलले नाही म्हणून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी र

संगमनेर बसस्थानक परिसरात साचले पाणीच पाणी
पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…
रोहमारे कुटूंबाचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान : आमदार सुधीर तांबे

संगमनेर/प्रतिनिधी ः तहसीलदारांना केलेले फोन उचलले नाही म्हणून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणे बारा वाजता संगमनेरमध्ये घडला. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम थोरात (पूर्ण नाव माहित नाही) रा. मालदाड रोड, संगमनेर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या तहसीलदार मांजरे यांच्या मोबाईलवर दहा ते बारा कॉल करण्यात आले होते. मात्र झोपेत असल्यामुळे तहसीलदारांनी कॉल उचलला नाही. त्यामुळे शुभम थोरात याने तहसीलदार राहत असलेल्या मालपाणी नगरमधील त्यांच्या घरी जात मेन गेटचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. तहसीलदारांच्या घराशेजारी राहत असलेल्या राजाराम चत्तर यांनी त्यांना फोन करून आपल्या गेटचा दरवाजा कोणीतरी मोठमोठ्याने वाजवत असल्याचे सांगितले. तसेच तो व्यक्ती गेटचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून चत्तर यांच्या घराचा दरवाजा वाजवत तहसीलदारांना आवाज देत होता. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसीलदारांच्या घराची बेल वाजवून दारावर थाप मारल्याने तहसीलदारांनी दरवाजा उघडला असता, आरोपीने तुम्ही माझा फोन का उचलत नाही अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. तुमची काही अडचण असेल तर उद्या ऑफिसला या असे तहसीलदारांनी त्याला सांगितले असता काही एक कारण नसतांना त्याने विनाकारण तहसीलदार मांजरे आणि शेजारी राजाराम राजाराम चत्तर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करतच आरोपी परत निघून गेला. सकाळी कार्यालयात आल्यानंतर चौकशीअंती तहसीलदारांना रात्री घरी आलेल्या व्यक्तीचे नाव शुभम थोरात असल्याची माहिती समजली. त्यानंतर तहसीलदार धीरज मांजरे यांनी शहर पोलिस ठाण्यात थोरात यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. थोरात यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाळू तस्कर मुजोर झाल्याची चर्चा – तहसीलदारांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रकार हा, वाळू तस्करीशी संबंधित असल्याची चर्चा आहे. पोलिस चौकशीनंतर या प्रकरणातील माहिती समोर येणार आहे. संगमनेरसह राज्यातील वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाचा तालुक्यात पुरता फज्जा उडाला असून वाळू उपसा सुरूच आहे. यामागील मोठे अर्थकारण यास कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यातून वाळू तस्कर मुजोर झाल्याचे दिसते.

COMMENTS