Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

मुंबई प्रतिनिधी - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी

काँगे्रस नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
म्हाडाच्या सोडतील यंदा अल्प प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत, तर ठार मारू असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २७ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत”, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने ई-मेलमध्ये म्हटलं होतं. धमकीचा ई-मेल आल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे

COMMENTS