Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात लखनऊच्या पोलीस

डॉ. शिवाजी काळेे यांचा सन्मान म्हणजे एका ज्ञानतपस्वी शिक्षकाचा गौरव  
वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी
म्हसवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनीच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाने ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाताने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार आहे असं या अज्ञात व्यक्तीने धमकावलं. ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

COMMENTS