Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांधकाम विभागातील सचिव प्रशांत नवघरे यांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव पदावर कार्यरत असलेले प्रशांत नवघरे यांचा अकाली मृत्यू झाला आहे. दक्षिण मुंबईच्या फोर्टमधील एका ह

अदानी आणि मोदी दोघे एकच
लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी
उत्तराखंडमध्ये हिंसाचाराचा आगडोंब

मुंबई/प्रतिनिधी ः सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव पदावर कार्यरत असलेले प्रशांत नवघरे यांचा अकाली मृत्यू झाला आहे. दक्षिण मुंबईच्या फोर्टमधील एका हॉटेलात जेवत असताना प्रशांत नवघरे यांचा मृत्यू झाला. ते 57 वर्षांचे होते. हॉटेलमध्ये जेवत असताना नवघरे एकाएकी कोसळले. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
काळाघोडा परिसरातील तृष्णा हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करत असताना प्रशांत नवघरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ऍलर्जीची लक्षणे दिसू लागल्यानंतर नवघरेंचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी प्रशांत नवघरे त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी एकाएकी कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

COMMENTS