Homeताज्या बातम्यादेश

चार जवानांचा होरपळून मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये गाडीला आग लागून दुर्घटना

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला लागलेल्या भीषण आगीत चार जवानांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामागे काही घा

ओबीसी आरक्षणात घुसखोरी नकोच
दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळला विहिरीत | LokNews24
 शितलकुमार गोरे  समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला लागलेल्या भीषण आगीत चार जवानांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामागे काही घातपात तर नाही ना, यादृष्टीने लष्कराकडून चाचपणी करण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात ही घटना वीज पडल्यामुळे घडल्याचा दावा केला जात आहे. पण सोबतच ट्रकवर ग्रेनेड हल्ला झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, आग लागण्याचे 3 कारणे समोर आले असून, यामध्ये ब्लास्ट, ग्रेनेड हल्ला व वीज कोसळणे या कारणांचा समावेश आहे. घटनास्थळी पाऊस सुरू होता. त्यामुळे लष्कर सर्वच अंगाने या घटनेचा तपास करत आहे. दुर्घटना घडली ते ठिकाण पुंछहून 90 किमी अंतरावर आहे. लष्कराच्या ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत चार जवानांचा होरपळून मृत्यू झाला होता.

COMMENTS