Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकहून निघालेल्या लाँगमार्च मधील शेतकऱ्याचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी - नाशिक ते मुंबई पायी आलेल्या किसान सभेच्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. पुंडलिक जाधव अ

दख्खनची राणी ९२ व्या वर्षात पदार्पण करणार
हाय प्रोफाईल पत्राचा पर्दाफाश व्हावा !
Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

मुंबई प्रतिनिधी – नाशिक ते मुंबई पायी आलेल्या किसान सभेच्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. पुंडलिक जाधव असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावचे रहिवासी होते. जाधव यांच्या मृत्यूची वृत्त समजताच आंदोलक शेतकऱ्यांनी शहापूर येथील ग्रामीण रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. शेतकऱ्यांच्या व आदिवाशीच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. शुक्रवारी या लाँग मार्चचा पाचवा दिवस होता. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केल्याने मोर्चा गुरुवारपासून ठाण्यातील वाशिंद येथे थांबला आहे. दरम्यान आज पुंडलिक जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सोबतच्या शेतकऱ्यांनी त्यांना ठाण्यातील शहापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं लाल वादळ किसान सभेच्या नेतृत्वात मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकाराने शेतकऱ्यांची मागण्या केल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात ‘वन जमिनीबद्दल सर्व निर्णयाचे अंमलबजावणीचे आदेश आम्ही दिले आहे, शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे.

COMMENTS