Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू

सातारा : सातार्‍यातील माण तालुक्यात लोधवडे जवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी अपघात झाला आहे. या अपघातात बोल

अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू
बीडमध्ये दोन अपघातात १० जणांचा मृत्यू
कार आणि बाईकचा भीषण अपघात.

सातारा : सातार्‍यातील माण तालुक्यात लोधवडे जवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडी पूर्णपणे पलटी झाली. अपघातात गाडीतील 6 प्रवासी जखमी झाले आहेत तर चालकाचा मृत्यू झाला आहे. कल्याण भोसले असे मृत चालकाचे नाव आहे. हे सर्व प्रवासी कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे असल्याची माहिती समोर आली आहे. एका गाडीला ओव्हरटेक करताना गाडी रस्त्यावर अचानक जम्प झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून, चार पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला गाडी गेली. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी सातार्‍यातील खाजगी रुग्णालयात हलवले आहे.

COMMENTS