Homeताज्या बातम्यादेश

बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

जबलपूर प्रतिनिधी - बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममधून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जबलपूर येथील बाबांच्या धाममध्ये दीड वर्षाच्य

रेल्वेची 25 टक्क्यांपर्यंत भाडेकपात
मालगाडीच्या खाली बसून चार मुलांचा प्रवास
मुख्यमंत्र्यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा

जबलपूर प्रतिनिधी – बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममधून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जबलपूर येथील बाबांच्या धाममध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर धाममध्ये सुरू असलेल्या भागवत पंडालमध्ये ही घटना घडली आहे. गुदमरणे हे मुलीच्या मृत्यूचे कारण सांगितले जात आहे. वास्तविक तेथे अति उष्णतेमुळे आणि श्वास घेण्यासाठी हवा नसल्याने चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममध्ये भागवत पंडाल लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पंडालमध्ये भागवताची कथा होत होती. ही कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले होते. बाबा धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांचीही गर्दी झाली होती. अति उष्णता आणि गर्दीमुळे एका लहान मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची प्रकृती खालावल्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला पाहताच तिला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. रडून रडून आई बाबांची अवस्था वाईट झाली आहे.त्यांच्यासोबत एवढा मोठा अपघात झाला यावर कुटुंबाचा विश्वास बसत नाहीये.एवढेच नाही तर या अपघातानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.मुलीच्या मृत्यूनंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS