Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात नवजात बाळाचा मृत्यू

पुणे ः पिंपरी चिंचवड शहरा जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या एक कार ट्रकला पाठीमागून वेगात धडकून झालेल्या भीषण अपघातात नवजात बाळाचा दुर्दैवी

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले
Mangalvedha : ट्रॅक्टर – मोटारसायकलचा भीषण अपघात… एकाच जागीच मृत्यू … (Video)
खड्ड्यामुळे तोल गेल्याने मागून येणाऱ्या बसने तरुणाला चिरडलं.

पुणे ः पिंपरी चिंचवड शहरा जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या एक कार ट्रकला पाठीमागून वेगात धडकून झालेल्या भीषण अपघातात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या दोनजणाना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत रावेत पोलिसांनी माहिती दिली की, मुंबई बंगलोर महामार्गावर देहूरोड परिसरात सेंटोसा हॉटेल समोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक स्विफ्ट कार चालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी वाहन ट्रकच्या मागील बाजूस वेगात धडकली आणि गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. या धडकेत कार मधील एक महिन्याच्या नवजात बाळाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला त्यावेळी शिरगाव भागातील परंदवडी येथील रहिवासी असलेली एक महिला तिच्या एक महिन्याच्या आणि एक दोन वर्षाच्या बाळाला घेऊन हॉस्पिटल मधून पुन्हा घराकडे जात असताना ही अपघात घटना घडली. या अपघातात जखमी वाहन चालक आणि आई व मुलास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालक देखील या अपघातात जखमी झाला आहे.याबाबत पुढील तपास रावेत पोलीस करत आहे.

COMMENTS