Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवजात बाळाचा हातातून पडून मृत्यू

नाशिक प्रतिनिधी - नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेच्या प्

प्रियकराच्या घरात प्रेयसीने घेतला गळफास ; कारण ऐकून पोलिसही हैराण | LOKNews24
अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद

नाशिक प्रतिनिधी – नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेच्या प्रसूतीदरम्यान प्रशिक्षण देताना डॉक्टरच्या हातातून पडून बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गोंधळ केला. नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .मिळालेल्या माहितीनुसार, वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या प्रसूतीदरम्यान प्रशिक्षण देताना रुग्णालयातील डॉक्टरच्या हातातून पडून बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी वसंत पवार मेडिकल रुग्णालयामध्ये डॉक्टरांवर एकच आरडोओरड करायला सुरुवात केलीडॉक्टरच्या चुकीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर रुग्णालयाने स्पष्टीकरण दिलं. नवजात बालकाच्या मृत्यूनंतर बाळ आधीच दगावल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. नवजात बालकाच्या मृत्यूनंतर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर डॉक्टरांनी दिशाभूल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे

COMMENTS