रस्त्याअभावी नाल्याच्या पुरातून मृतदेह स्मशानभूमीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याअभावी नाल्याच्या पुरातून मृतदेह स्मशानभूमीत

महागाव तालुक्यातील माळकीन्ही येथील नागरिकांची व्यथा

यवतमाळ प्रतिनिधी / महागाव तालुक्यातील माळकीन्ही गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृतदेह चक्क नाल्याच्या पुरातून न्यावा लागला. या घटनेने

बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदू मंदिरावर, घरांवर हल्ला
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार
राज्य फेडरेशनची क्रॉस प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये

यवतमाळ प्रतिनिधी / महागाव तालुक्यातील माळकीन्ही गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृतदेह चक्क नाल्याच्या पुरातून न्यावा लागला. या घटनेने तरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.  गावातील एका तरुणाचा आजाराने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणण्यात आला. मात्र, पाऊस सुरू असल्याने नाल्याला पूर आला होता. अशावेळी पलीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क नाल्याच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली.

COMMENTS