Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई ः नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याला कर्नाटकाती

अखेर जखमी गोविंदाचा दुर्देवी मृत्यू
पाच मंत्र्यांसह दहा सचिव आले आणि गेले
औषधनिर्माण क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडवणारे केंद्र

मुंबई ः नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पोलिस दाऊदी शेखची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. त्याने यशश्रीला का मारले या प्रश्‍नासंबंधी आणि इतर तपास पोलिस करत आहेत. दाऊद शेख याला कर्नाटकच्या गुलबर्गा येथून मंगळवारी अटक करण्यात आली. पहाटे पाच वाजता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. यशश्रीची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्‍चाताप नव्हता. यशश्री आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मैत्री होती. उरणमध्ये दोघेही एकाच परिसात राहायला होते. यशश्रीच्या कुटुंबियांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर दाऊद विरोधात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता.

तो तुरुंगातून नुकताच बाहेर आला होता. दाऊद उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी संपर्क साधला. त्यावेळी दोघांनी भेटायचे ठरवले. दोघांमध्ये घटनेच्या दिवशी भेट झाली. त्यावेळी दाऊदने तिला लग्नाची गळ घातली. लग्नाला नकार दिल्यानेच तिची हत्या केल्याचे दाऊद शेखने पोलिसांना सांगितले. यशश्री हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. जलदगती न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे प्रकरण हाताळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांसोबत चर्चेनंतर याविषयीची माहिती दिली होती. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान दुसर्‍या एका प्रकरणात आरोपी दाऊद पुणे पोलिसांना हवा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकमधून पोलिसांनी अजून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दाऊद हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दाऊद आणि त्याच्यामध्ये काय संवाद झाला, याचा तपास पोलिस करत आहेत.

COMMENTS