Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या

हत्येनंतर स्वतःही गळफास घेवून केली आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरात मंगळवारी बहिणीला कौटुंबिक कारणावरून त्रास देत असल्याच्या कारणावरून मेव्हण्याने दाजीचा डोक्यात रॉड घालून त्याचा निर्घृ

मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून
बारामतीमध्ये कोयता व कुर्‍हाडीने विद्यार्थ्याची हत्या
भररस्त्यात चाकुने वार करत तरुणाची हत्या.

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरात मंगळवारी बहिणीला कौटुंबिक कारणावरून त्रास देत असल्याच्या कारणावरून मेव्हण्याने दाजीचा डोक्यात रॉड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना बाणेर जवळ उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर मेव्हण्याने देखील गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात मंगळवारी मेव्हण्याने दाजीची हत्या केल्याचे समोर आले आहे. मेव्हणा धनंजय पद्माकर ताडेकर (वय-36) आणि हेमंत रत्नाकर काजळे (वय-40) अशी दोघांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. मयत धनंजय गाडेकर हा पीजी होस्टेल चालवण्याचा व्यवसाय करत होता तर त्याचे दाजी हेमंत काजळे हे बेकार होते. गाडेकर यांच्या बहिणीचे काजळे सोबत लग्न झाल्यानंतर सातत्याने कौटुंबिक कारणावरून काजळे हा पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे सोमवारी रात्री त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. याचा राग मनात धरून काजळे याने तोडकर याचा खून केला त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची माहिती चतुर्शिंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.

COMMENTS