Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय राऊत

जिल्हा निरीक्षक म्हणून फायक अली सय्यद यांची नियुक्ती

जामखेड ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद, तर जामखेड तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रक

कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
जलसिंचनाचे योग्य नियोजन केल्यास परिसर समृद्ध होतो : सुवर्णा माने
सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे

जामखेड ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद, तर जामखेड तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांची निवड झाल्याबद्दल जामखेड पत्रकार संघ व जामखेड मिडिया क्लबच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.  यावेळी जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष आशोक निमोणकर, जामखेड मिडिया क्लबचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, अजय अवसरे, निलेश वनारसे, जाकिर शेख यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने जिल्हा कार्यकारणीची मीटिंग आयोजित केली होती या मीटिंगमध्ये सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष, जिल्हा निरीक्षक, तालुका अध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या. यात नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद तर जामखेड तालुकाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांची निवड यांच्या निवडी करण्यात आल्या याबद्दल अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. या दोघांच्या निवडीबद्दल जामखेड शहरात व तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

COMMENTS