सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगडावर श्री समर्थांच्या कृपाशीर्वादाने प
सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगडावर श्री समर्थांच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामदास स्वामी संस्थान तर्फे माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य दशमी म्हणजेच गुरुवार, दि. 17 फेब्रुवारी ते शनिवार, दि. 26 फेब्रुवारी या कालावधीत 340 वा दासनवमी महोत्सव साजरा होत आहे.
येत्या रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी दासनवमी महोत्सवाचा मुख्य दिवस आहे. या महोत्सवात श्री समर्थ समाधीसमोर विविध मान्यवरांचे कीर्तन, प्रवचन, गायन आदी सेवा सुरू आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे सातारा जिल्हाधिकार्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार हे कार्यक्रम संपन्न होत आहेत. सर्व समर्थ भक्तांना संस्थानच्या फेसबुक पेज द्वारे घरबसल्या श्रीसमर्थ समाधीचे दर्शन घेता येत आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी श्री दुर्गा प्रसाद स्वामी यांनी दिली.
माघ वद्य अष्टमी गुरुवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत समर्थभक्त मंदार बुवा रामदासी यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी 3 ते 4 या वेळेत श्रीपाद लिंबेकर, पुणे यांचे गायन होणार आहे. दुपारी 4 ते साडेपाच या वेळेत पुणे येथील समर्थभक्त अजित गोसावी यांचे दासवाणी हा कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेनऊ ते 11 या वेळेत ढोकी येथील राघवेंद्र बुवा रामदासी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 25 फेब्रुवारीला शुक्रवारी माघ वद्य नवमी असून यादिवशी दासनवमी कार्यक्रमानिमित्त पहाटे 2 वाजता काकड आरती होऊन पहाटे 4 वाजता श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीची महापूजा होणार आहे. त्यानंतर पहाटे साडेसहा वाजता सांप्रदायिक भिक्षा होऊन सकाळी साडेदहा वाजता आरती आणि छबिना प्रदक्षिणा होणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता अध्यात्मरामायण आणि दासबोध आरती होऊन सज्जनगड येथील सुरेश बुवा सोन्ना रामदासी हे श्री समर्थ निर्याण कथा कथन करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री साडेनऊ ते 11 या वेळेत ढोकी येथील राघवेंद्र बुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाची सांगता शनिवार, दि. 26 रोजी पहाटे साडेसहा वाजता आरती व छबिना होऊन सकाळी साडेसात वाजता राघवेंद्र बुवा रामदासी यांच्या ललिताच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती रामदास स्वामी संस्थांच्या वतीने देण्यात आली.
COMMENTS