Homeताज्या बातम्यासंपादकीय

दाभोळकर हत्या तपास आणि न्याय

भारतीय समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना विज्ञानवादी आणि विवेकवादी बनवण्यासाठी आपली संपूर्ण ह्यात खर्ची घातलेले डॉ. नरेंद्र दाभ

‘नीट’चा घोळ
काँगे्रसचा बदलता चेहरा
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?

भारतीय समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना विज्ञानवादी आणि विवेकवादी बनवण्यासाठी आपली संपूर्ण ह्यात खर्ची घातलेले डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारखे व्यक्तीमत्व दुर्मिळ. समाजाला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी त्यांची सुरू असलेली तळमळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. हाडाचे डॉक्टर असलेले पण सामाजिक अंग असलेले डॉक्टर दाभोळकरांनी कर्मठ आणि सनातन्यांचा रोष ओढवून घेतला. परिणामी हा रोष त्यांची हत्या करण्यापर्यंत पोहचला. वास्तविक पाहता त्यांची हत्या 2013 मध्ये करण्यात आल्यानंतर त्यांच्या मारेकर्‍यांना तब्बल 11 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारेकर्‍यांना जन्मठेप ठोठावण्यात आली असली तरी, या हत्येमागील मास्टरमाईंड मोकाट सुटल्याचे दिसून येत आहे. खरंतर दाभोळकरांच्या हत्येमागे सनातन संस्थेशी संबंधित अनेकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा), सचिन अंदुरे (र. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि अ‍ॅड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालात 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेसह 5 लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हत्येच्या 11 वर्षांनंतर हा निकाल आला आहे. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याशी संबंधित खटल्यांसाठी विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जाधव यांनी हा निर्णय दिला. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे. त्यामुळे दाभोळकरांच्या हत्येमागील मास्टरमाईंड कोण हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो. खरंतर पोलिस या हत्येचे मास्टरमाईंड कोण, यापर्यंत पोहचले असतांनाच हा तपास त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. वास्तविक पाहता या प्रकरणात सनातन संस्थेचा अनेकवेळेस संबंध असल्याचा उल्लेख झाला. या संस्थेशी संबंधित व्यक्तींना अटकही झाली. मात्र त्या हत्येमागे मास्टरमाईंड ही संस्था असल्याचे पुरावे पोलिस देवू शकलेली नाही. त्यामुळ दाभोळकरांच्या हत्येचा तपास पोलिसांच्या दृष्टीने पूर्ण झाला असला तरी, तो तपास अपूर्णच आहे. या तपासामध्ये फक्त गोळ्या झाडणार्‍या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र त्यांना आदेश देणारे कोण, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. खरंतर दाभोळकरांच्या सामाजिक आणि अंधश्रद्धेविरोधी कार्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होतीच. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण देण्याची तजवीज करण्यात आली होती. मात्र दाभोळकर म्हणाले होते की, मला माझ्याच देशात पोलिस स्वतःच्या लोकांकडून संरक्षण घ्यायचे असेल तर मला काहीतरी चुकीचे वाटते, मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे. पोलीस संरक्षण नाकारल्यानंतर दाभोलकर. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट, 2013 मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्‍वर पूल) अज्ञातांनी 4 गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत. त्यासंदर्भात आरोपींनी त्यांची रेकी केली असल्याचे देखील समोर आले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले . गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर 25 ते 30 वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसर्‍याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले दाभोळकर खरंतर बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. 1982 साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स. 1989 साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले होते. मात्र धर्मांधांना या समाजाला विज्ञानवादी होवू द्यायचे नव्हते. परिणामी त्यांची हत्या करण्यात आली. मात्र आजही त्यांच्या हत्येचे मास्टरमाईंड मोकाट असल्यामुळे त्यांच्या हत्येचा तपास अपूर्णच असल्याचे खेदाने म्हणावे लागते. 

COMMENTS