Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा

तामिळनाडूसह पद्दुचेरीमध्ये दिसणार प्रभाव

चेन्नई वृत्तसंस्था - राज्यात एकीकडे थंडीची चाहूल जाणवत असतांना,  दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाताव

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अधिक धोका l पहा LokNews24
नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या कामावरून  पेटला वाद 
राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष

चेन्नई वृत्तसंस्था – राज्यात एकीकडे थंडीची चाहूल जाणवत असतांना,  दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होताना पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तामिळनाडूसह पद्दुचेरीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर काही प्रमाणात कमी होणार असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चक्रीवादळ उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ गेल्या सहा तासांत ताशी 10 किलोमीटर वेगाने पश्‍चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. चक्रीवादळ हे पश्‍चिम-वायव्येच्या दिशेने सरकत असून आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वार्‍याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रावर विशेष प्रभाव पडणार नाही – या चक्रीवादळाचा राज्यातील थंडीवर परिणाम पाहायला मिळणार आहे. चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणार्‍या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्‍चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता जाणवणार नाही. चक्रीवादळ वार्‍याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार्‍या स्थितीमुळे त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणार्‍या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे.

COMMENTS