Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वडूज पोलीस स्टेशनकडून परत

वडूज / प्रतिनिधी : येथील पोलीस स्टेशनकडून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 मध्ये सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची झालेली 4,44,143 /- रुपये रक्कम फिर्यादी या

वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनास शासनाची मंजुरी
जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘त्या’ योजनेचा लाभ

वडूज / प्रतिनिधी : येथील पोलीस स्टेशनकडून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 मध्ये सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची झालेली 4,44,143 /- रुपये रक्कम फिर्यादी यांना परत केली असून या कामगिरीबद्दल परिसरात कौतुक होत आहे.
याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, वडुज पोलीस ठाणे हद्दीत राहणारे तक्रारदार अनिल नरबत यांची 25000/-, अर्जुन मारुती कुंभार यांचे 23608/-, दिपाली सचिन कांबळे यांची 64,341/-, जोतीराम जाधव यांची 1,76,000/-, ओंकार गलंडे यांची 8886/-, आनंदराव बागल यांची 8650/-, चारुदत्त गाढवे यांची 25000/-, कृष्णदेव नारायण माळी यांचे 64,000/-, कैसुर शेख यांचे 1434/-, कल्पना कोल्हे यांचे 7569/-, मेउद्दीन मुल्ला यांचे 10000/-, मयुरी जोशी यांचे 875/-, राजेंद्र सानप यांचे 13800/-, शिवाजी माळी यांचे 20000/- अशी एकूण 4,44,143/- रक्कमेची फसवणुक झाबाबत त्यांनी तात्काळ वडुज पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने महिला पोलीस अंमलदार प्रियांका पवार यांनी त्याबाबत महाराष्ट्र सायबर क्राईम हेल्प लाईन नंबर 1930 वरती त्यांचे तक्रारी नोंदविण्यास सांगितली व महाराष्ट्र सायबर क्राईम यांच्यामार्फत संबधितांचे खाते गोठविण्यात आले.

COMMENTS