खटाव / वार्ताहर : थंड हवेच्या ठिकाणी होणारी स्ट्रॉबेरीची शेती आता खटाव तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात बहरलेली पहावयास मिळू लागली आहे. पुसेगाव येथी

खटाव / वार्ताहर : थंड हवेच्या ठिकाणी होणारी स्ट्रॉबेरीची शेती आता खटाव तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात बहरलेली पहावयास मिळू लागली आहे. पुसेगाव येथील शेतकरी राजेश देशमुख यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग साकारला.
माण-खटाव तालुका म्हणजे कायम दुष्काळाने ग्रासलेला अशी ओळख आहे. या पट्ट्यातील शेती रामभरोसे असते. शेतकर्यांच्या पिकांवर निसर्ग पाणी फिरवतो. या परिसरात पावसाचे प्रमाण नगण्य असते. पडला तर धो-धो पडतो. जेंव्हा अपेक्षित असतो अशा वेळी अवकृपा दाखवतो. अशा समस्यांना सामोरे जाताना शेतकर्यांच्या पदरी निराशा येते. पिकासाठी खर्ची घातलेला पैसा हाती येण्याची कधीही शाश्वती नसते. अशा परिस्थितीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या त्यांच्या सहकार्यांनी खटावच्या दुष्काळी जमिनीवर स्ट्रॉबेरीचे पिक घेण्याचा यशस्वी प्रयोग साधला आहे. कमी दिवसांत जास्त पैसे कमवण्यासाठी असे प्रयोग करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पटवून दिले आहे.
प्रारंभी देशमुख यांच्यासमोर थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची असा प्रश्न उभा राहिला होता. यासाठी त्यांनी महाबळेश्वरमधील तज्ज्ञ शेतकर्यांना ओसाड जमिनीची पाहणी करण्यासाठी आणले. उष्ण तापमानात स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची, याबाबत मार्गदर्शन घेतले. तीन वर्षे यावर अभ्यास करून ऑगस्टमध्ये 30 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरी बहरली. आता एकदिवसाआड 15 ते 20 हजारांप्रमाणे महिन्याकाठी अडीच ते तीन लाखांची उलाढाल सुरू आहे. त्यांनी हा प्रयोग इथे थांबवला नाही, त्यांनी स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली आहे. सध्या स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये लसणाचे आंतरपिक घेतले आहे. उर्वरित क्षेत्रात दुसरे आंतरपीक घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या नगदी उत्पन्नापाठोपाठ घरातील लोकांना लागणार्या पिकांचेही ते उत्पन्न घेवू लागले आहेत.
COMMENTS