Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रिप्टोचा खेळ संपला, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा – कडलग

कार्यशाळेत डॉक्टरांनी गिरविले आर्थिक साक्षरतेचे धडे

संगमनेर/प्रतिनिधी ः क्रिप्टोचा खेळ संपलेला आहे, कोणतीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो हा एक सट्टा आह

पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसाची आत्महत्या
तिरुपतीला पाच किलो सोन्याची तलवार अर्पण DAINIK LOKMNTHAN
ताहराबादमध्ये घराचे कुलूप तोडून दागिने चोरीला

संगमनेर/प्रतिनिधी ः क्रिप्टोचा खेळ संपलेला आहे, कोणतीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो हा एक सट्टा आहे, त्यात गुंतवणूक करण्याऐवजी सामान्य व्यक्तीला कोट्याधीश करण्याची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करा व आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा असा सल्ला एमएफडी सुनील कडलग यांनी दिला.
     नारायणगाव येथील हॉटेल सचिन एक्झिक्यूटिव्ह कॉन्फरन्स हॉलमध्ये जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे शनिवारी आयोजित नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ.हनुमंत भोसले व प्रमूख अतिथी म्हणून सेक्रेटरी डॉ. निलेश थोरात, एनजे वेल्थचे शाखाधिकारी शुभम कोळी, मनिष पवार, डीएसपी म्युच्युअल फंडाचे पियुष कासट उपस्थित होते.
    आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात कडलग पुढे म्हणाले की जानेवारी 2023 मध्ये 40 लाख कोटींचा असलेला म्युच्युअल फंड उद्योग येत्या पाच ते सहा वर्षांमध्ये शंभर लाख कोटींचा होण्याची शक्यता आहे. शिवाय सद्यस्थितीत जगात पाचव्या क्रमांकाला असलेली भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या काही वर्षांत तिसर्‍या क्रमांकाला असण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली. भारत हा युवकांचा देश आहे. युवकांमध्ये खर्च करण्याची क्रयशक्ती आहे. त्यामूळे कंपन्यांच्या उत्पादनाची मागणी वाढत आहे. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमाविल्यास त्याचा फायदा गुंतवणूदारांना होईल. म्हणूनच ज्या देशात खर्च होतो तो देश संपत्ती निर्माण करतो. मंदीच्या पार्श्‍वभूमीवर पार्श्‍वभूमीवरही भारत जगामध्ये ब्राईट स्पॉट ठरतो आहे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केले आहे म्हणूनच परदेशातूनही गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात भारतात येत आहे. कोरोना सारखी आपत्कालीन परिस्थिती कधीही निर्माण झाल्यास प्रत्येकाकडे आपत्कालीन निधीची व्यवस्था असायला हवी , त्यासाठी म्युच्युअल फंडातील लिक्वीड फंडस् उपयुक्त ठरू शकतो असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ.अनिल भोसले, डॉ. उत्तमराव घोरपडे, डॉ. अविनाश पोथारकर, डॉ. प्रवीण उगले, डॉ. अजित काकडे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना सुनील कडलग, शुभम कोळी, पियुष कासट यांनी उत्तरे दिली. डॉ. मुक्तांजली पोथरकर यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉ. हनुमंत भोसले यांनी सन्मानचिन्ह देऊन सुनील कडलग यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी डॉ. निलेश थोरात यांनी तर सूत्रसंचालन डॉ.आनंद सराईकर यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. कविता भोसले यांनी केले. डॉ. शशिकांत गुळवे, डॉ. मनोहर कवडे, डॉ. राजेश धुमाळ, डॉ. रामदास उदमले, डॉ. सुजाता गोर्डे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

म्युच्युअल फंडात केवळ 20 टक्केच बचत – भारतीय बँकांमध्ये साधारणतः 150 ते 170 लाख कोटींच्या बचत ठेवी आहेत. त्या तुलनेत म्युच्युअल फंडात मात्र फक्त 20 टक्केच रक्कम आहे. महागाईच्या तुलनेत अधिक परतावा देणार्‍या म्युच्युअल फंडाकडे सद्यस्थितीत गुंतवणुकीचा कल वाढत आहे. जानेवारी 2023 मध्ये प्रति महिना 14000 कोटींच्या एसआयपीचा ओघ शेअर बाजारात येत आहे म्हणून शेअर बाजाराला आता परदेशी गुंतवणूकदारांच्या दयेवर अवलंबून राहण्याचे कारण राहिलेले नाही हे मागच्या वर्षभरात सिद्ध झालेले आहे.

COMMENTS