Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीक कर्जाचे व्याज सभासदांना परत करणार ः अमोल राळेभात

जामखेड ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी सलंग्न प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या नियमित कर्जदार सभासदांकडून वसूल केलेले व्याज तत्काळ कर्जदार सभासद

श्रीगोंद्यात शिवसेनेची महिला शाखा कार्यकारिणी जाहीर
अहिल्यानगर शहरात समता व्याख्यानमालेचे आयोजन
शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.

जामखेड ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी सलंग्न प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या नियमित कर्जदार सभासदांकडून वसूल केलेले व्याज तत्काळ कर्जदार सभासदांच्या बचत खाती जमा करणार असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.
कर्जदार सभासदांकडून 31 मार्च 2024 अखेर कर्ज रकमेवरील व्याज वसूल करण्यात आले होते, परंतु जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दिनांक 15 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत वसूल झालेले व्याज परत केले जाणार असल्याचे बँकेने याअगोदरच जाहीर केले होते. परंतु 15 ते 31 मार्च 2024 या दरम्यान भरणा केलेल्या सभासदांना याचा लाभ न देता यामध्ये वाढ करून 1 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत मुद्दल व्याजासह भरणा केलेल्या सभासदांचे व्याज परत करावे, अशी मागणी सर्व संचालकांनी सभेमध्ये एकमताने केल्यानंतर त्यास चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी लगेच होकार दिला आणि कार्यवाही करणेबाबत प्रशासनास सूचना दिल्या असे अमोल राळेभात यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे 1 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान ज्या कर्जदार सभासदांनी मुद्दल व्याजासह कर्ज रकमेचा भरणा केला आहे त्यांचे रु. 3 लाखापर्यंतचे व्याज त्यांना परत केले जाणार असून याबाबत बँकेस तसेच सहकारी संस्थेस तशा सूचना दिलेल्या असून रकमा जमा करणेची कार्यवाही सुरु झालेली असून सभासदांच्या बचत खाती रक्कम वर्ग केली जाणार आहे. ज्या संस्थांचे नुतनीकरण प्रस्ताव योग्य त्या पुर्ततेसह मंजुरीसाठी प्राप्त झाले ते प्रस्ताव तत्काळ मंजूर करून घेवून संस्था सचिव, बँक कर्मचारी यांचेकडून सुट्टीदिवशी जादा वेळ काम करून घेवून दिनांक 23 एप्रिल 2024 अखेर तालुक्यातील 95 % वाटप पूर्ण झाले असून सभासदांच्या रूपे केसीसी खात्यावर 66 कोटी 44 लाख 38 हजार 400 इतकी रक्कम जमा केली असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.

COMMENTS