Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकीकडे टीका, दुसरीकडे एकाच गाडीतून प्रवास

खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच गाडीतून प्रवास

पुणे/कोल्हापूर ः राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमाच्या स्थळी एकाच गाडीतून आल्यामुळ

जरांगे यांनी मुख्यमंत्र्यावर विश्‍वास ठेवावा; देवेंद्र फडणवीस
बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे
सामान्य माणसाला भयमुक्त व सुरक्षिततेचे ठिकाण वाटेल असे काम करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे/कोल्हापूर ः राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमाच्या स्थळी एकाच गाडीतून आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रविवारी सकाळी शरद पवारांनी कोल्हापूरात शिंदे-फडणवीस सरकारवर टीकची झोड उठवत सत्तेत आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असते, असे सांगत घणाघाती टीका केली. त्याचवेळी दुपारी पवार आणि फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एकाच गाडीतून आल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

पवार-फडणवीस एकत्र असतांना त्यांनी नेमकी कुठल्या मुद्यावरून चर्चा केली या बाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. दोन्ही नेते हे दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पुण्यात एकाच गाडीतून आले. हा कार्यक्रम भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता.  दरम्यान, पुण्यात येण्यापूर्वी शरद पवारांनी रविवारी सकाळी कोल्हापूरात सत्ताधार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला.

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या सत्ताधारी नेत्यांकडून देण्यात येत आहे. नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं आणि धमक्या देण्याचे काम सत्ताधार्‍यांचे नाही. काही नेते तर यावरून टोकाची भूमिका घेत आहेत. परंतु सत्ता आल्यानंतर नेत्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. त्यामुळे आता पवारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे. शरद पवार कोल्हापुरच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नेत्यांना धमक्या देणे किंवा तुरुंगात टाकण्याची भाषा सत्ताधार्‍यांनी करणे हे दुर्दैवी असून सत्ताधार्‍यांची ही टोकाची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते, असे म्हणत पवारांनी शिंदे-फडणवीसांना खोचक टोला हाणला आहे. लोकसभा निवडणुकीआधी राममंदिराचे उद्घाटन केले जाणार असल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाबाबतचे वक्तव्य पुजार्‍यांनी किंवा महंतांनी केले असते तर बरे झाले असते. परंतु गृहमंत्री अमित शहा पुजार्‍यांची भूमिका का घेत आहे?, मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठीच शहा यांनी हे वक्तव्य केल्याची टीका शरद पवारांनी अमित शहांवर केली आहे.

चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे ःउपमुख्यमंत्री फडणवीस
देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते फडणवीस म्हणाले, आज चीनमधून उद्योग बाहेर पडत असताना हे उद्योग भारतात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, त्यासाठी त्याप्रकारचे शिक्षण द्यावे लागले. त्यादृष्टीने भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्व आहे.

COMMENTS