Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाशच्या स्टाफवर दाखल गुन्हे राजकीय सुडबुध्दीने : मकरंद देशपांडे

पोलिसांचे आम्हाला सहकार्य नाही; तक्रारीसाठी पोलिसांचे दबावतंत्र सुरुआमच्या सहकार्‍यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषगांने आम्ही पोलिसांना पुर्

विरोधकांकडून शेतकर्‍यांचे अर्थिक शोषण : निशिकांत भोसले-पाटील
सातारा जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी
शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापती बिनविरोध

पोलिसांचे आम्हाला सहकार्य नाही; तक्रारीसाठी पोलिसांचे दबावतंत्र सुरु
आमच्या सहकार्‍यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषगांने आम्ही पोलिसांना पुर्णत: सहकार्य केले आहे. मात्र, पोलीस ज्याची तक्रार आहे. त्यांच्या उपचार व बिलांच्या समरीच्या अनुषगांने तपास करत नाहीत. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांना व नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलवुन हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची नांवे सांगून त्यांनी पैसे घेतले. असा दबाब स्वत: तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण आणत आहेत. हे अत्यंत बेकायदेशीर आहे. तपासकामात आम्ही सहकार्य केले आहे. मात्र, पोलीस आम्हांला त्यांनी काढलेल्या त्रुटीबाबत न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्यासाठी कोणती ही माहिती देत नाहीत. काही रुग्ण व नातेवाईकांनी त्यांच्यावर दबाब आण्याची तक्रार नोटरीद्वारे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे केली आहे. ती तक्रार आम्ही न्यायालयात सादर करणार आहे.
कुलदीप खांबे,
सचिव
प्रकाश शिक्षण कामगार युनियन, उरुण-इस्लामपूर

इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये काम करणारे डॉक्टर्स व सहकारी स्टाफ यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे राजकीय सुडबुध्दीने केलेले कटकारस्थान आहे. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेली रूग्णांची सेवा रूग्ण व रूग्णांच्या कुटुंबांना आधार व धीर देणारी होती. कोरोना योध्दांचा खर्‍या अर्थाने सन्मान होण्याऐवजी त्यांना गुन्हेगार केले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पोलीस व आरोग्य अधिकार्‍यांनी राजकिय व्यवस्थेच्या हुकुमशाहीला मुजरा न करता समाजात चांगले काम करणार्‍या घटकावर बेकायदेशीर कारवाई करू नये. अन्यथा भविष्यात आपला योग्य सन्मान केला जाईल, असा इशारा भाजपा पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी दिला.
प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर्स व सहकारी स्टाफच्या न्याय व हक्कासाठी प्रकाश कामगार युनियनच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणास्थळी भाजप पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणाला बसलेल्या डॉक्टर्स, इतर कर्मचारी व कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस संजय हवलदार, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गौरव खेतमर, अल्ताफ तहसिलदार उपस्थित होते.
मकरंद देशपांडे म्हणाले, राज्यातील सत्ताबदलानंतर राज्यकर्त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग स्वतःच्या विकासाठी केला. सत्ताधार्‍यांनी हुकुमशाही चालवून पोलिस अधिकार्‍यांवर दबाव आणला. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देण्याचे धोरण राबविले आहे. आपण कोरोना काळात केलेले काम हे समाजातील प्रत्येका घटकापर्यत पोहचले आहे. न्याय देवता आपल्याला योग्य न्याय देईल, आपण खंबीरपणे या विकृत विचाराच्या आक्रमणाला संघटितपणे पुढे जाऊया. भविष्यात आरोग्य व शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अधिक जोमाने काम करू या. असा धीर व आधार शेवटी त्यांनी दिला.
यावेळी प्रकाश कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष सुजित पाटील, सचिव कुलदीप खांबे आदि पदाधिकार्‍यांनी आपल्याला राजकीय व्देषातून होत असलेल्या त्रासाचा घटनाक्रम मकरंद देशपांडे यांना सांगितला. यावेळी एल. आर. पी. आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. विरेंद्र मिनकिरे, प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य मधुकुमार नायर, नर्सिंग कॉलेजचे शशीकांत हंकारे यांच्यासह प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर सहकारी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

भाजपा पक्ष दखल घेणार
भाजपा पदाधिकारी व राजकीय विरोधक म्हणून आपल्या संस्थेला व संस्थेत काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना गेल्या दोन वर्षापासून पोलीस व आरोग्य अधिकारी यांचा नाहक त्रास होत आहे. विरोधकांचा दबाव हा अधिकार्‍यांवर जरी असला तरी अधिकार्‍यांनी आपण जनतेचे सेवक आहोत. एखाद्या राजकीय पक्षाचे व नेत्याचे कार्यकर्ते नाही. आपला अधिकार हा समाजात चांगले काम करणार्‍याला गुन्हेगार ठरविण्यासाठी नाही. प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर बाबत केलेल्या बेकायदेशीर कारवाईचा अहवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडणार आहे. या पंचनामा विधानसभा व विधानपरिषदेच्या सभागृहात केला जाईल. वेळप्रसंगी तुमच्या न्याय हक्कासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा विश्‍वास मकरंद देशपांडे यांनी कामगारांना दिला.

COMMENTS