Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीजेप्रकरणी 14 मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पडली असून या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळा अंतर्गत मतदारसंघात बंधाऱ्याचे कामास ८ कोटी ३२ लक्ष मंजूर – आ. मोनिका राजळे यांची माहिती
शासकीय कोरोना तपासणी केंद्रातील वेळेची मर्यादा हटवावी- सौ कोल्हे
शेततळयात पडून दोन लहानग्या भावांचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पडली असून या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मिरवणुकीत डीजे वाजविल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून डीजे साहित्य जप्त केले आहेत.

यासंदर्भात पोना योगेश सिताराम खामकर यांनी फिर्याद दिली आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ठाकरे गट, शिंदे गट तसेच विविध मंडळांच्या पदाधिकार्यांना आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. मिरवणुक सुरु झाल्यानंतर डी.जे.चा आवाज क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले त्यामुळे पोलिसांनी किती डेसिबलचा आवाज आहे, याची इम्पिरियल चौकापासून तपासणी सुरु केली. पोलीस उपनिरिक्षक सुखदेव दुर्गे,पोकॉ महेश बोरुडे, इस्माईल पठाण यांनी पंचासमक्ष तपासणी केली असता अखंड हिंदू समाज माळीवाडा राजाचा डी.जे.104.7 इतक्या क्षमतेने, शिवजयंती उत्सव नालेगाव 109.0, वर्चस्व ग्रुप 112.2, हिंदू राष्ट्रसेना 110.5, शिवसेना शिंदे गटाचा डि.जे.113.9, तुळजाभवानी युवा मंच, 105.7, शिवसेना ठाकरे गट 113.7 इतक्या मोठ्या आवाजात डि.जे.वाजवून ध्वनी प्रदूषण करीत होते. या संदर्भात पोलीसांनी मंडळाच्या पदाधिकार्यांना आवाजाच्या रिडींगची पावती देण्याचा प्रयत्न केला;पण पदाधिकार्यांनी पावती घेतली नाही. ध्वनी प्रदुषण चालुच ठेवले. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, डी.जे.चालक, मालक यांच्यावर भादवि कलम 188, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. संभाजी अशोकराव कदम (रा. माळीवाडा), संतोष चंद्रकांत शिंदे (रा. सांगळे गल्ली), दिलीप नानाभाऊ सातपुते (रा. रंगोली हॉटेल जवळ, केडगाव), संजय पांडुरंग आडोळे, सचिन पाराजी दिवटे (रा. वंजारगल्ली, मंगलगेट), निखील कैलास गहिले (रा. नालेगाव), दिनेश दत्तात्रय खरपुडे (रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा) अशी मंडळाच्या पदाधिकार्यांची नावे आहेत तर योगेश विलास कामटे (रा. फुरसंगी, ता. हवेली), योगेश सांडू पाटील (रा. शिवाजीनगर, पुणे), गणेश तुकाराम मोरे (रा. मांजरी खुर्द, ता. हवेली), गणेश तान्हाजी चव्हाण (रा. धावडेनगर, ता. हवेली), प्रविण रंगराव पाटील (रा. सावडे, कोल्हापूर), सतीश अशोक कुंजीर (रा. थेऊर, ता. हवेली), मनोज किसन लोणकर (रा. केडगाव,ता.दौंड) अशी डीजे चालकांची नावे आहेत.

COMMENTS