माजी नगरसेवक कैलास गिरवलेंना मारहाण करणार्‍या पोलिसांवर गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगरसेवक कैलास गिरवलेंना मारहाण करणार्‍या पोलिसांवर गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर महापालिकेचे माजी नगरसेवक कैलासमामा गिरवले यांना मारहाण करणार्‍या दोन पोलिसांविरुद्ध येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा द

रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…
मंदिर रिकामे, कोविड सेंटर फुल्ल!
लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर महापालिकेचे माजी नगरसेवक कैलासमामा गिरवले यांना मारहाण करणार्‍या दोन पोलिसांविरुद्ध येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी ही मारहाण झाली होती. सीआयडीने चौकशी करून याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेले पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे आणि इतरांवर मारहाणीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर माजी नगरसेवक कैलासमामा गिरवले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात काठीने मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस कर्मचार्‍यांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.4) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक वैशाली मुळे यांनी भिंगार पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली आहे. मृत माजी नगरसेवक कैलासमामा रामभाऊ गिरवले यांना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकामी दि.8 एप्रिल 2018 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास चौकशीसाठी त्यांच्या घरुन एलसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. तेथे एलसीबीच्या साध्या वेशातील दोन कर्मचारी यांनी मृत कैलास गिरवले यांना काठीने मारहाण करुन दुखापत केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज्-कॅमेरा नं.1 मध्ये तपासात निष्पन्न झाल्याने पोलिस नाईक रवींद्र कर्डिले व विजय ठोंबरे व इतरांवर भा.दं.वि.क. 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

चौकशीनंतर गुन्हा
सीआयडीच्या चौकशीनंतर सीआयडीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. मृत गिरवले हे जेलमध्ये असताना कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना वर्ग करून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असताना त्यांना त्रास जाणवू लागल्याने सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर गिरवले कुटुंबीयांनी तक्रार करीत पोलिसांच्या मारहाणीमुळे गिरवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी सीआयडीमार्फत सुरू होती. त्याचौकशी नंतर सीआयडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या हत्याकांडानंतरची घटना
मनपाच्या केडगाव येथील एका रिक्त जागेची 6 एप्रिल 2018 रोजी निवडणूक झाली होती व 7 एप्रिलला मतमोजणी होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा नगरसेवक निवडून आला. या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात तणाव होता. निकालानंतर 7 रोजी सायंकाळी केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. पोलिसांनी त्यानंतर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले होते. पण त्यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांना परत आणले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला व गोंधळ प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या माजी नगरसेवक कैलास गिरवले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात काठीने मारहाण करण्यात आली. त्यामुळे सीआयडीने चौकशी करून तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS