Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदा सावकारी करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यात बेकायदा सावकारी करून एका व्यावसायिकाला धमकावणार्‍या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डॉ. विनोद गो

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी
पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला
तोफखाना पोलिसांची मद्यपी वाहन चालकाविरुद्ध कारवाईची मोहीम 

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यात बेकायदा सावकारी करून एका व्यावसायिकाला धमकावणार्‍या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डॉ. विनोद गोपीचंद मेहेर (वय 39, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचा ग्रो कमोडिटी ट्रेंडिंगचा व्यवसाय आहे. आळेफाटा येथील डॉ. विनोद मेहेर यांना व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. तेव्हा डॉ. मेहेर यांनी गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले होते. चार टक्के व्याजाने पैसे पैसे देतो, असे सांगून डॉ. मेहेर यांनी व्यावसायिकाला एप्रिल 2019 मध्ये 25 लाख रुपये दिले. त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी व्याज म्हणून कापून घेतले.

COMMENTS