Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्ये रेल्वे रुळला तडा

लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

ठाणे प्रतिनिधी -  ठाकुर्ली आणि कल्याणजवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी आज सकाळी ६.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे इंद्रा

लोकसभेच्या सर्वच जागा काँग्रेस लढवणार : आ. पृथ्वीराज चव्हाण
वरवरा राव यांनी मागितली हैदराबादला जाण्याची परवानगी
नगरच्या बिग्मीद्वारे तब्बल 100 कोटींची फसवणूक; एसआयटी चौकशीची ठेवीदारांची मागणी

ठाणे प्रतिनिधी –  ठाकुर्ली आणि कल्याणजवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी आज सकाळी ६.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असून त्याने ट्रक फ्रॅक्चर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती. लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याचा परिणाम लोकल सेवेवरही झालेला पाहायला मिळत आहे. कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, रेल्वे गाड्या उशीराने धावणार असल्या तरी लाइनमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे दोन्ही लाइनमनचेही कौतुक केलं जात आहे.

COMMENTS