नागपूर : राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्यानंतर उर्वरित नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी काल मंगळवारी मतदान पार

नागपूर : राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्यानंतर उर्वरित नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी काल मंगळवारी मतदान पार पडले. त्याचा निकाल आज बुधवारी जाहीर होणार होता. मात्र तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने बुधवारी होणारी मतमोजणी रद्द करून सर्व निवडणुकांच निकाल 21 डिसेंबरला लावण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.
निकाल लांबवणे लोकशाहीला अनुरूप नाही : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या इतक्या वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवात हा प्रकार प्रथमच पाहतोय. ते म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्या, मतदानही झाले, पण निकाल इतक्या वेळाने लागणार आहे. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या तरी पद्धतीला अनुरूप नाही. त्यांनी नमूद केले की, हे प्रकार राजकीय खोलात जातात, पण त्याचा सर्वाधिक फटका अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांना बसणार आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, मी निवडणूक आयोगावर आरोप करणार नाही, पण ज्यावेळी नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातो, तेव्हा प्रक्रियेवर प्रश्न येते. त्यांनी सांगितले की, जिथे सर्व काही योग्य पद्धतीने पार पडले आहे, तिथेही निकाल पुढे ढकलला गेला हे न्यायालयाने केलेले असून, निवडणूक आयोगाने पुढच्या निवडणुका योजताना या चुका टाळाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
देशात मनमानी सुरू : राज ठाकरे
देशात मनमानी सुरू आहे, अशा 4 शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS