Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात लाचखोर आरटीओ अधिकार्‍याला पदोन्नती

पुणे ः राज्याच्या परिवहन विभागाच्या एका निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लाचखोरीच्या गं

उपअभियंता बापट, पन्हाड आणि पाटील यांचा कोट्यावधींचा अपहार  
घेणार्‍यांवर कठोर कारवाई करा; किनवटमध्ये संघटना आक्रमक
एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा

पुणे ः राज्याच्या परिवहन विभागाच्या एका निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लाचखोरीच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या एका सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याला पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने ‘पारदर्शक प्रशासन’ या संकल्पनेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य परिवहन विभागाने सोमवारी (9 फेब्रुवारी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील चाळीस सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या यादीत राजेंद्र केसकर या अधिकार्‍याचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र केसकर यांना यापूर्वी गोंदिया येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करत असताना सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.

COMMENTS