वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना संसर्ग झाला असून या संदर्भात व्हाइट हाऊसने प्रसिद्धीपत्रक जारी करून याची माहिती दिली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना संसर्ग झाला असून या संदर्भात व्हाइट हाऊसने प्रसिद्धीपत्रक जारी करून याची माहिती दिली आहे. जो बायडन यांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत आणि ते विलगीकरणात राहून काम सुरू ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बायडन आता झूम कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बायडन हे सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष असून त्यांचे वय 79 वर्षे आहे. दरम्यान कोरोना बाधित आढळल्यानंतर बायडन यांना सर्दी, थकवा येणे आणि कोरडा खोकला अशा समस्या जाणवत आहेत, अशी माहिती व्हाइट हाउसचे डॉ. केविन ओ कॉनर यांनी दिली. त्यांच्यावर अँटीव्हायरल पॅक्सलोविड उपचार केले जात आहेत.
COMMENTS