Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या डोक्यावरील जिरेटोपामुळे वादंग

पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीतून तिसर्‍यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केली. यावेळी एनडीएमधील देशभरातील प्रमुख नेते उप

लग्नाच्या जेवणात पनीर नसल्यानं वऱ्हाड्यांमध्ये राडा
कर्नल पुरोहितांच्या पुस्तक प्रकाशनाला पुरोगामी संघटनांचा विरोध
‘शिवसेनेत खूप उडतोयस’ असं म्हणत उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला !

पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीतून तिसर्‍यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केली. यावेळी एनडीएमधील देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. मात्र जिरेटोपावरून राजकीय वादंग रंगतांना दिसून येत आहे.
जिरेटोपावरून शरदचंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.  प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, जिरेटोप आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! अशा शब्दात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. या विषयी आपल्या पोस्टमध्ये प्रशांत जगताप म्हणाले की, ’प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, जिरेटोप आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे…. अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्कार्‍यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी पंतप्रधानांच्या नामांकनाला उपस्थित होते. साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणही वाराणसीला पोहोचला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते.

COMMENTS