Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मुंबई :  राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणार्‍या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुस

महसूल तूट चिंताजनक
मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवीचे नाव देण्यात यावे ; मनसेची मागणी 
धुलीवंदनाची अनोखी परंपरा, जावयाची गाढवावरून मिरवणूक

मुंबई :  राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणार्‍या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) 9822446655  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) 18002334000  क्रमांकावरही संपर्क करता येईल.  संबंधितांनी व्हॉट्सप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोर्‍या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकर्‍यांना व्हॉट्सपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.  शेतकर्‍यांना त्यांच्या तक्रारी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे. 

COMMENTS