अहिल्यानगर : केडगाव देवी परिसरातील लोंढे मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कानीफनाथ भक्त कै. शिवराम तुकाराम लोंढे यांच्या प्र

अहिल्यानगर : केडगाव देवी परिसरातील लोंढे मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कानीफनाथ भक्त कै. शिवराम तुकाराम लोंढे यांच्या प्रेरणेने तसेच श्रीनाथ प्रतिष्ठानच्या नियोजनातून हा धार्मिक सोहळा रविवार (ता. १५) ते गुरुवार (ता. १९ मार्च) दरम्यान होणार आहे.
सप्ताहात शिवलीला अमृत पारायण व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दररोज पहाटे ५ ते ६ काकड भजन, सकाळी ८ ते दुपारी १ नवनाथ पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७.३० वाजता महाआरती, तर रात्री ८ ते १० हरिकीर्तन आणि त्यानंतर हरिजागर असा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी ह.भ.प. सोनाजी (मामा) महाराज शिंदे यांचे कीर्तन व ह.भ.प. शाहीर लक्ष्मणभाऊ हांडे यांचे प्रवचन होणार आहे. सोमवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज गाडेकर यांचे कीर्तन व ह.भ.प. नवसुपे महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे कीर्तन तर ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांचे प्रवचन होणार आहे. बुधवारी ह.भ.प. महेश महाराज मडके यांचे कीर्तन व ह.भ.प. बाळासाहेब महाराज बोरकर यांचे प्रवचन होईल.
गुरुवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. वैभव महाराज काळे (नेवासा) यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासाठी कानीफनाथ सेवा मंडळ, श्रीनाथ प्रतिष्ठान तसेच समस्त केडगाव ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.

COMMENTS