कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे पगारे वस्ती नजीक झगडेफाटा कोपरगाव रोडवर कोपरगाव मार्गे येत असलेल्या कंटेनरने ॲपे रिक्षा
कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे पगारे वस्ती नजीक झगडेफाटा कोपरगाव रोडवर कोपरगाव मार्गे येत असलेल्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले जखमींपैकी उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात झाली आहे. सकाळी ०८वाजेच्या सुमारास ही घटना घडली
पी.बी.०५ ए. बी.४००६ असा कंटेनरचा नंबर असून रायपूर कडून तो औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जात होता.त्यात लोखंडी सळया भरलेल्या होत्या.चालकाचे नाव दर्शनसिंग गजनसिंग (वय-४१)आहे.त्याला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर रिक्षाचा क्रमांक एम.एच.१७ ए.जी.९०५६ असा असून तो चांदेकसारे येथील विलास साहेबराव खरात यांच्या मालकीची आहे..दरम्यान जखमीमध्ये रिक्षातील चार जण तर दुचाकीवरील तीन जण असल्याचे समजते.या रिक्षात एकूण चालकासह दहा प्रवासी प्रवास करत होते.त्यात सहा जण जागीच ठार झाले आहे तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहे.याच कंटेनरने मोटारसायकल धडक दिली त्यातील दोघे जण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे.घटना घडल्यानंतर कंटेनर चालक आपला कंटेनर घेऊन पसार होत होता. ही घटना माजी सरपंच केशवराव होन ,सरपंच संजय गुरसळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील तरुणांच्या मदतीने कंटेनरचा पाठलाग करत झगडे फाटा नजीक कंटेनर पकडला.सदर घटनेची माहिती केशवराव होन यांनी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना दिली असता तेही घटनास्थळी दाखल झाले. राजाबाई साहेबराव खरात (वय-६०) रा.चांदेकसारे,आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय-६५)वावी, पूजा नानासाहेब गायकवाड (वय-२०),हिंगणवेढे,प्रगती मधुकर होन वय-२०) रा.चांदेकसारे,शैला शिवाजी खरात (वय-४२) रा.श्रीरामपूर, शिवाजी मारुती खरात वय-५२) रा.श्रीरामपुर आदीचा या दुर्दैवी घटनेत अंत झाला तर उपचार चालु असताना रुपाली सागर राठोड ( वय १० ) हीचा मृत्यू झाला .कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.तर श्री संत जनार्दन स्वामी रुग्णालयात राठोड ध्रुव सागर (वय-१५),चौधरी कृष्णाबाई गोविंद,(वय-४२) ,चौधरी सर्वेश दिगंबर (वय-१२),रा.पोहेगाव,खरात कावेरी विलास (वय-०५) रा.झगडे फाटा,ता कोपरगाव. विलास साहेबराव खरात (वय-३०) रा.झगडे फाटा यांच्या वर उपचार चालू आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारार्थ रवाना केले होते. कंटेनर चालका विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ मयत प्रगती मधुकर होन ही कोपरगाव येथे सोमय्या महाविद्यालयात एस वाय बी ए चे शिक्षण घेत होती. सध्या परिसरात एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना मिळेल त्या साधनाने कॉलेजला जावे लागते. त्यामुळेच प्रगतीने ॲपे रिक्षाचा आधार घेतला मात्र हा आधारच तिच्या जीवावर उठला.अशा घटना थांबवायच्या असेल तर कोपरगाव बस आगाराने कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गावात बस सुरु करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे
COMMENTS