Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतूक शाखेचा विधायक उपक्रम; 1000 टोचालकांना गणवेश भेट !

लातूर प्रतिनिधी - रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करण्याचा विचार असून, त्यासाठी लातूर शहर वाहतूक शाखा, विविध सामाजिक संस्था, व्यापार्‍यांच्या पुढाकारा

कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
  कोळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनी अवस्था
‘वंचित’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार

लातूर प्रतिनिधी – रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करण्याचा विचार असून, त्यासाठी लातूर शहर वाहतूक शाखा, विविध सामाजिक संस्था, व्यापार्‍यांच्या पुढाकारातून तब्बल एक हजार ऑटोचालकांना मोफत गणवेश वाटपाचा विधायक उपक्रम लातूर पोलिसांनी हाती घेतला आहे. याचा प्रारंभ शनिवारी गांधी चौक ठाण्यात एका कार्यक्रमात करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये पोलिसांनी 200 ऑटोचालकांना गणवेश भेट दिला. कार्यक्रमाला डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी, पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अजित भुतडा, मनीष बोरा, गौरव ब्रिजवासी, अग्रवाल, जितू मुंदडा, महेश बिलगुडी यांचा सत्कार करण्यात आला. लातुरातील ऑटो रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करावी का? असा प्रश्न पहिल्यांदा पोलिसांसमोर आला. मात्र, आता तातडीने प्रत्येक ऑटोचालकांना गणवेश घेणे शक्य होणार नाही. यासाठी पोलिसांनीच विविध सामाजिक संस्था, व्यापार्‍यांशी संवाद साधत आवाहन केले. या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या सहभागातून तब्बल 1 हजारांवर मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेतला. पहिला टप्पा म्हणून गांधी चौक येथे शनिवारी कार्यक्रमात 200 रिक्षाचालकांना गणवेशाची भेट दिली. लातुरातील ऑटो रिक्षाचालकांना आता गणवेश सक्ती केली जात आहे. त्यासाठी लातूर पोलिसांकडून ऑटोचालकांना गणवेश वाटप केले जात आहेत. यासाठी ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि परमिट आहे, अशा एक हजार परवानाधारक रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. लातूर शहर वाहतूक पोलिस शाखेने खटले दाखल करून वाहनधारकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून रिक्षाचालकांना गणवेश वाटप करण्याचा विधायक उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या सहकार्यातून तब्बल एक हजार रिक्षाचालकांना मोफत गणवेशाची भेट दिली जात आहे.

COMMENTS