Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांधकाम मजुराचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

पुणे ः पुण्यातील एका बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना कात्रज परिसरात घडली असून, बांधकामाच्

सर्वपक्षीय बैठकीच आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण
ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न गंभीर -डॉ. शिल्पा पाठक
आकाशातून पडली उल्कासदृश्य वस्तू | LOK News 24

पुणे ः पुण्यातील एका बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना कात्रज परिसरात घडली असून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेविषयक उपाययोजना न करता मजुराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रामू रामसिंग राठोड (वय 40, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे) असे मयत झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येस जबाबदार ठरल्याने ठेकेदार महमद तौसिफ आलम (वय 35, रा. सिंहगड कॉलेजजवळ, वडगाव बुद्रुक,पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक फौजदार रवींद्र भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कात्रज भागातील खोपडेनगर परिसरात अंबालिका लॅण्डमार्क कंपनीकडून नर्मदा सिटी गृहप्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. सहाव्या मजल्यावर राठोड काम करत असताना लिफ्टसाठी असलेल्या मोकळ्या जागेतून राठोड तोल जाऊन खाली पडला. दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम ठेकेदार आलमने सुरक्षेविषयक आवश्यक उपाययोजना केल्या नाही. तसेच त्याठिकाणी संरक्षक जाळी देखील बसवली नव्हती. मजुरांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना केल्या नसल्याचे तपासात उघडकीस आले. त्याानंतर बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एस शेंडे पुढील तपास करत आहेत.

COMMENTS