Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यात सरन्यायाधीश गवई यांच्या समर्थनार्थ संविधान संघर्ष मोर्चा

सातारा / प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व न्याय मंदिरातील प्रमुख भूषण गवई यांच्यावर सनातनी विचाराच्या वकिलाने हल्ला केला. त्याचा नि

राष्ट्रवादीच्या संजय कोरे यांना शिवसेनेची दारे खुली : सागर मलगुंडे
उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू
खंडाळ्याच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी दिन साजरा

सातारा / प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व न्याय मंदिरातील प्रमुख भूषण गवई यांच्यावर सनातनी विचाराच्या वकिलाने हल्ला केला. त्याचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी व संविधानाला प्रामाणिकपणाने मांडणार्‍या विचारांच्या राजकीय पक्षाने आज संयुक्त संविधान संघर्ष मोर्चा काढला. या मोर्चाला अभूतपूर्व यश मिळाले. सत्ताधारी व विरोधी पक्षातील बेगडी संविधान प्रेम सुध्दा यानिमित्त उघडे पाडण्यात आले, अशी प्रतिक्रिया दलित समाजातील नेत्यांनी व्यक्त करून खरी परिवर्तनवादी विचाराची कास धरण्याचे आवाहन केले.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून हजारोंच्या
संख्येने महामोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. त्या ठिकाणी मान्यवर आंबेडकरवादी नेत्यांनी आपले विचार व्यक्त करण्यापूर्वी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना लेखी निवेदन सादर केले. आंदोलकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून जिल्हाधिकार्‍यांनी सर्वांचीच मने जिंकली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर दि, 6 ऑक्टोंबर रोजी नवी दिल्ली न्यायालयाच्या दालनात झेड सुरक्षा असतानाही सर्वोच्च न्यायालयात एका जातीयवादी मानसिकतेच्या वकिलाने बुट फेकला. ही घटना अत्यंत दुर्दैवी, असंविधानिक आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर हा प्रकार फक्त वैयक्तिक हल्ला नसून, भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला गंभीर आघात करणारा आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर व्यक्तिगत हल्ला नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवर केलेलज्ञ हल्ला आहे. या कृत्यामुळे जगात भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली आहे. संविधानवादी आणि आंबेडकरवादी विचारधारेचे नागरिक, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर मनुवादी विचाराच्या वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकून मारण्याचा जो निंदनीय प्रयत्न केला, त्याचा तीव्र शब्दांत निषेध निवेदनाद्वारे व्यक्त केला.
संविधान संघर्ष मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोर्चा सहभागी होऊन एकजूट दाखवली.

COMMENTS