नवी दिल्ली :मन की बातमधून देशवासियांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे

नवी दिल्ली :मन की बातमधून देशवासियांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केले.
पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा ! महाकुंभ मेळ्याचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या विशालतेतच नाही. कुंभाचे वैशिष्ट्य त्यातील वैविध्यात देखील आहे. या कार्यक्रमात कोट्यवधी लोक एकावेळी एकत्र येतात. लाखो संत, हजारो परंपरा, शेकडो पंथ, अनेक आखाडे प्रत्येकजण या कार्यक्रमाचा एक भाग बनतो. कुठेही भेदभाव दिसून येत नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. विविधतेतील एकतेचे असे दृश्य जगात कुठेही दिसणार नाही. म्हणूनच आपला कुंभमेळा हा एकतेचा महाकुंभही आहे. यावेळच्या महाकुंभातूनही एकतेच्या महाकुंभाचा मंत्र दृढ होणार आहे. मी तुम्हा सर्वांना सांगेन की, जेव्हा आपण कुंभमेळ्याला जाल, तेव्हा एकतेचा हा संकल्प घेऊन परत या. आपण, समाजातील फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथही घेतली पाहिजे. पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2024 मध्ये आपण चित्रपटसृष्टीतील अनेक महान व्यक्तींची 100 वी जयंती साजरी करत आलो आहोत. या व्यक्तिमत्त्वांनी भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. राज कपूरजींनी चित्रपटांच्या माध्यमातून, जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरची- सुप्तशक्तीची ओळख करून दिली. रफीसाहेबांच्या आवाजात असलेली जादू प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी होती आणि आहे. त्यांचा आवाज अप्रतिम होता. भक्तिगीते असोत की प्रेमगीते असोत. दर्दभरी गाणी असोत, प्रत्येक भावना त्यांनी आपल्या आवाजाने जिवंत केली. कलाकार म्हणून त्यांची महत्ता किती आहे, हे आजही तरुण पिढी त्यांची गाणी तितक्याच तन्मयतेने ऐकते, यावरून समजते- हीच कालातीत कलेची ओळख आहे.
COMMENTS