इतिहास, समाज आणि एकतेवरचा हल्लाइस्लामपूर / प्रतिनिधी : उरूण-इस्लामपूर या शहराच्या नावाच्या बदलाचा कट, जो काही धर्मांध, मनुवादी विचारांचे, संकुच

इतिहास, समाज आणि एकतेवरचा हल्ला
इस्लामपूर / प्रतिनिधी : उरूण-इस्लामपूर या शहराच्या नावाच्या बदलाचा कट, जो काही धर्मांध, मनुवादी विचारांचे, संकुचित राजकीय हेतूने प्रेरित लोक रचत आहेत. उरूण इस्लामपूर केवळ नाव नाही, ती एक सांस्कृतिक ओळख आहे असल्याचे काँग्रेस अल्प संख्याक अध्यक्ष शाकिर तांबोळी यांनी सांगितले.
तांबोळी म्हणाले, उरुण-इस्लामपूर हे नाव दोन ऐतिहासिक घटकांपासून तयार झाले उरूण हे गाव आणि इस्लामपूर हा कालांतराने विकसित झालेला शहरी भाग. हे नाव सन 1874 पूर्वीपासून सरकारी अभिलेखांमध्ये अस्तित्वात आहे. या शहरात संभूआप्पा- बुवाफन हे ग्रामदैवत. ज्या देवस्थानात हिंदू-मुस्लिम दोघेही सहभागी होतात. हे शहर एकतेचे प्रतीक आहे. याच नावाने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरारी घेतली. बनावट राष्ट्रवाद आणि खोट्या गौरवाच्या नावाखाली समाजात फूट पाडत आहेत. इस्लाम शब्द न आवडल्यामुळे ईश्वरपूर अशी नाव बदलाची मागणी करणे म्हणजे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांना झुगारणे होय.
हे नाव बदल हे सामाजिक ऐक्यावर, अल्प संख्याक समाजाच्या अस्तित्वावर आणि सांस्कृतिक समरसतेवर सरळ हल्ला आहे. ईश्वरपूर नावाचा ना इतिहास आहे, ना संस्कृती, ना जनतेचा भावनिक वा पारंपरिक संबंध हे नाव धर्माधारित राजकीय एजेंड्याचा भाग आहे.
सदाभाऊ सात वर्षांत विकास शून्य…
विधानपरिषद सदस्य आ. सदाभाऊ खोत गेले सात वर्ष या भागाचे आमदार आहेत. पण शहराच्या पायाभूत सुविधांसाठी त्यांनी कोणताही ठोस लढा दिला नाही. ना मलमूत्र निचरा व्यवस्था सुधारली, ना शासकीय रुग्णालयाला दर्जा मिळाला, ना शिक्षण क्षेत्रात मोठा निधी आणला, ना उद्योजकतेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. आता मात्र ते इस्लामपूरच्या नामातंरासाठी निवेदने देत फिरत आहेत.
COMMENTS