Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस जोमाने लढविणार ः नागरे

कोपरगाव प्रतिनिधी ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात  ग्रामपंचायत निवडण

रेशमबाई पिंगळे यांचे निधन
आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित | DAINIK LOKMNTHAN
अहमदनगर जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा

कोपरगाव प्रतिनिधी ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात  ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस जोमाने लढविणार असून, जास्तीत जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी सांगितले.
03 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असुन कोपरगाव मतदार संघात एकूण 21 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर  केले असून त्यात कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहीगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर, कान्हेगाव तर 04 मतदारसंघातील (राहाता) तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, पुणतांबा-रस्तापुर  या ग्रामपंचायतील उमेदवारी अर्ज-दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर,  छाननी-23 ऑक्टोबर, माघारी मुदत-25  ऑक्टोबर, चिन्हांचे वाटप-25 ऑक्टोबर, मतदान – 05 नोव्हेंबर, मतमोजणी-06 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुक तालुका काँग्रेस ताकदीनिशी सामोरे जाण्याचा एकमुखी निर्धार केलेला आहे. ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोचलेला असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत निश्‍चित होणार आहे. पक्ष जोमाने ग्रामापंचायत निवडणुका लढविणार असून, जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी सांगितले.

COMMENTS