केरळ- केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल 300 पेक्षा जास्त लोकांचा मुत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे

केरळ– केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल 300 पेक्षा जास्त लोकांचा मुत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे, जीव ढिगार्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. या दौर्यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस 100 पेक्षा जास्त घरे बांधून देणार आहे.
राहुल गांधींनी सांगितले की, वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भयंकर दुर्घटना आहे. आम्ही घटनास्थळी जाऊन भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठक घेतली आहे. यावेळी प्रशासनाने दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि नुकसान झालेल्या घरांची संख्या सांगितली. यावेळी आम्ही पक्षाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच 100 पेक्षा जास्त घरे बांधण्यासाठी काँग्रेस कटिबध्द आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
COMMENTS