Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकांसाठी आता काँग्रेसही सक्रीय 

नाशिक प्रतिनिधी -  आगामी महापालिका व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेना शिंदे गटापाठोपाठ आता कोमात गेलेली काँग्रेसची फळीही अॅक्टिव

कोपर्डी बलात्कारातील मुख्य आरोपीची आत्महत्या
उन्हाची तीव्रता; निसर्ग सौंदर्य आणि पशू-पक्ष्यांना जपा !
लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या वाजणार

नाशिक प्रतिनिधी –  आगामी महापालिका व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेना शिंदे गटापाठोपाठ आता कोमात गेलेली काँग्रेसची फळीही अॅक्टिव्ह झाली आहे. महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या चाचपणी करण्यासह संघटना बांधणीसाठी काँग्रेसकडून शहरात पाच ब्लॉकमध्ये प्रभारींची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासह प्रभाररचनेच्या याचिका प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे आता प्रथम लोकसभा निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने लोकसभा निवडणुका लक्ष करत, राज्यात महाविकास आघाडीमध्ये तोडफोड करीत, सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडल्यामुळे काँग्रेसला चांगली संधी आहे. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी पाचही विभागांत प्रभारी नियुक्त ‘आता अॅक्टिव्ह झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गटा- विभागली गेलेली कॉंग्रेस पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशांनुसार आगामी होणाऱ्या लोकसभा-विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी, तसेच उमेदवारांची चाचपणी करणे व ब्लॉकमध्ये बैठका घेण्यासाठी ब्लॉकनिहाय प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत.

हे आहेत प्रभारी – मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी ज्येष्ठ नेते नंदकुमार कर्डक, नवीन नाशिकमध्ये माजी सभागृहनेते राजेंद्र बागूल, पंचवटीत उल्हास सातभाई, सातपूरमध्ये संदीप शर्मा, व नाशिकरोडमध्ये माजी सभागृह नेते डॉक्टर सुभाष देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS