Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन !

 भारतीय महिला या आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने चमकू लागल्या आहेत. जगातल्या सगळ्या स्त्रिया यामध्ये आघाडीवर आहेतच! पण, भारतीय समाज पार

स्वप्नात झाला स्वामींचा साक्षात्कार… दुसऱ्यादिवशी घडला चमत्कार… श्री स्वामी समर्थ | LokNews24
आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या
सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई : राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 भारतीय महिला या आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने चमकू लागल्या आहेत. जगातल्या सगळ्या स्त्रिया यामध्ये आघाडीवर आहेतच! पण, भारतीय समाज पारंपारिक अधिक असल्यामुळे आणि धर्मावलंबी मतांचा अधिक पुरस्कार केल्यामुळ महिलांना दाबून ठेवण्यात आलं होतं. परंतु, संविधानाने दिलेला समान अधिकार आणि त्या अधिकाराची झालेली प्रत्यक्ष अंमलबजावणी, या दोन्ही बाबींमुळे पारंपारिक समाजातून भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे. क्रिकेटसारखे क्षेत्र हे तर पुरुषांसाठी राखीव क्षेत्र असावं, असा विचार काही वर्षांपूर्वी जगभरात होता. मात्र, याही क्षेत्रांमध्ये महिलांनी प्रवेश केला. महिला क्रिकेटपटू यांनी सुरुवातीला जे खेळ केले, त्यातही त्यांचं अधिक श्रम, योगदान, कौशल्य हे सगळं होतं; परंतु, त्यांच्या सामन्यांना मात्र गर्दी कमी होत होती. परंतु, काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये महिला क्रिकेट विश्व कपचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशातील महिला क्रिकेट संघामध्ये होत असताना, क्रिकेटचे स्टेडियम मात्र खचाखच भरलेले होते.  स्टेडियमचे हे दृश्य एकप्रकारे महिला खेळाडूंना दिलेला सन्मानाचा भाग होता. तो एक प्रकारे क्रिकेटपटू असणाऱ्या महिलांच्या दोन्ही संघांना सलामी देणारा होता! कोणत्याही खेळामध्ये विजय आणि पराभव हे ठरलेले असतात. परंतु, भारतीय मैदानावर दोन देशांच्या महिला क्रिकेट संघाची झुंज ही अतिशय महत्त्वपूर्ण होती. कारण, हा प्रसंग पूर्णपणे वेगळा होता. भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेटच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या प्रवेशामध्ये सुरुवातीला भारताने फलंदाजी करताना २९८ धावा करून क्रिकेट क्षेत्रामध्ये महिला काय कर्तव्य बजाऊ शकतात, याचं जणू शिखर त्यांनी या धावांच्या डोंगरातून उभं केलं. या धावांना प्रत्युत्तर देत दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ मैदानात उतरला. परंतु, कसा बसा हा संघ अडीचशेच्या आतपर्यंतच धावा करू शकला. अखेर ५२ धावांनी दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागला आणि भारतीय महिला क्रिकेट संघ क्रिकेट जगताच्या इतिहासामध्ये अव्वल क्रमांकावर आला!  हा प्रसंग सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असाच आहे. या सर्व महिला क्रिकेटपटूंचं आम्ही आमच्या तर्फे अभिनंदन करतो. कारण, पुरुषांच्या या क्षेत्रामध्ये महिलांनी ज्या पद्धतीने आपलं कर्तृत्व दाखवलं आहे, बजावलं आहे, त्या त्यांच्या कर्तृत्वाला निश्चितपणे सलाम केला पाहिजे! हरमनप्रीत कौरने भारतासाठी पहिली-वहिली महिला विश्वचषक ट्रॉफी उंचावत कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. आतापर्यंत भारतासाठी या तीन कर्णधारांनी विश्वचषकचे विजेतेपद पटकावले आहे. हरमनप्रीत कौरच्या या टीमने मिळवलेल्या सोनेरी यशाने भारतीय महिला क्रिकेटला एक नवी उमेद मिळणार आहे. ज्याप्रमाणे १९८३चा विश्वचषक भारताने जिंकल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेटचा चेहरा बदलला होता. त्याचप्रमाणे महिलांच्या या देदिप्यमान कामगिरीमुळे निश्चितच भारतीय महिला क्रिकेट एक नवी उंची गाठेल, यात शंकाच नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात धोनीने भारतासाठी विजयी षटकार मारला. भारतासाठी धोनीने ७९ चेंडूत ९१ धावा केल्या.  दरम्यान, भारताने २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. २००७ आणि २००४ च्या पुरुष वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईत भारतीय संघासाठी भव्य विक्ट्री परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे, महिला संघासाठीही तसाच मोठा सोहळा होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, बीसीसीआयकडून आलेल्या माहितीनुसार, सध्या तरी महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने कोणत्याही विक्ट्री परेडची योजना अंतिम करण्यात आलेली नाही. अखेर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने खिताबावर कब्जा मिळवला. रोमांचक अंतिम सामन्यात भारताने आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी नंतर हरमनप्रीत वर्ल्ड कप जिंकणारी देशाची तिसरी कर्णधार ठरली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता चाहत्यांना ‘विक्ट्री परेड’ची आतुरता आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या एका दूरदर्शी आणि धाडसी धोरणाचा देखील विजय आहे. वास्तविक पाहता, ऑक्टोबर २०२२ मध्ये बीसीसीआय ने एक मोठा आणि साहसी निर्णय घेतला होता. बीसीसीआयच्या १५ व्या सर्वोच्च परिषद बैठकीत, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने मॅच फी मिळणार होती. भारतीय संविधान उभार आर्थिक समानता  मिळाल्यानंतर, महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी पूर्ण एकाग्रतेने खेळावर लक्ष केंद्रित केले, ज्याचा परिणाम वर्ल्ड कप विजयाच्या रूपात आज दिसतो आहे. हा निर्णय भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट  मानला जातो. भारतीय प्राचीन समाजातही आपल्याला हे तत्त्व दिसतें. रोखीच्या स्वरूपात व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नातून श्रम आणि कर्तव्याला हुरूप येतो. पुन्हा, एकदा महिला क्रिकेट संघांचे अभिनंदन.

COMMENTS